yuva MAharashtra बांधकाम कामगारांच्या प्रलंबित विविध प्रश्नांसाठी जवाब दोन आंदोलन ; वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचा सहाय्यक कामगार आयुक्त यांना घेराव.

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित विविध प्रश्नांसाठी जवाब दोन आंदोलन ; वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचा सहाय्यक कामगार आयुक्त यांना घेराव.



        VIDEO 
https://youtu.be/paQq94c3Ah4?si=Wikct7D_TqL7kE8H

सांगली दि 14 : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्या कार्यालयावर जवाब दो आंदोलन घेण्यात आले. व साहेब कामगार आयुक्त यांना घेराव घालून विविध प्रश्नाबाबत खुलासा करण्याची मागणी करण्यात आली या निवेदनामध्ये
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय,सांगली.
कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या जिल्ह्यांत नूतनीकरण व नवीन अर्ज नोंदणीसाठी जवळपास ८० हजार सपूर्ण जिल्ह्यामध्ये अर्ज प्रलंबित आहेत, मुंबई तसेच पुणे या जिल्ह्यात बांधकामांचे कंट्रक्शन मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत त्या तुलनेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातच कशी काय जास्त बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे ते कोण तपासणार ? बोगस नोंदणीला कशा पद्धतीने आळा घालणार आहे ? तसेच खरे हक्कदार असणारे श्रमिक, कष्टकरी कामगारांनी १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन जमा केले आहेत त्यांना सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे. ते खरे हक्कदार आहेत. कारण मंत्र्यांनी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य, सांगली. यांची मागणी मान्य करून दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रत्येक नोंदीत बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देणार असल्याबाबत घोषणा केली आहे, त्यामुळे सदर कामगारांच्या वर अन्याय व्हायला नको आहे.सांगली कार्यालय आता नूतनीकरणाचे अर्ज गेले तीन ते चार महिन्यांपासून प्रलंबित आहेत. फक्त मंत्रीमहोदयाच्या मिरज विधानसभा मतदारसंघातलेच अर्ज निकाली काढले जात आहेत बाकी तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्यावर अन्याय केला जातोय ? त्यांना मानसिक त्रास का दिला जातोय, त्यांची पिळवणूक केली जात आहे. त्याचे आर्थिक नुकसान का केले जात आहे ? याचबरोबर लाभाचे दाखल अर्ज पडताळणी करण्यासाठी साठी दोन वर्षानंतर ची तारीख सुद्धा देत आहे, त्यामुळे कामगारांची काही चूक नसूनही निष्कारण अन्याय सहन करावा लागत आहे. १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज सादर केले आहेत त्यांना दोन वर्षांनी सानुग्रह अनुदान आणि इतर कल्याणकारी लाभ मिळणार का ? व त्यांची यावेळीची दिवाळी अंधारमय होणार का ? मंडळात मालक प्रतिनिधी आणि कामगार प्रतिनिधी नसताना विविध खाजगी कंपनीला ठेका देऊन मंडळाच्या शिल्लक निधीची लूट सुरू केले आहे. मात्र बांधकाम कामगारांच्या हिताचे प्रलंबित असणारे धोरणात्मक निर्णय का घेतले जात नाहीत ? याबरोबर आता कामगारांच्या हक्काच्या पैशावर दरोडा टाकता टाकता, श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांच्या रक्ताची तपासणीच्या नावाखाली तस्करी केली जात आहे का ? रक्त घेतेवेळी बांधकाम कामगारांच्या जिवीतवाचा प्रश्न उद्भवल्यास जबाबदार कोण? नियमाप्रमाणे डॉक्टरांची नियुक्ती असतानाही रक्त तपासणी करते वेळी डॉक्टर उपस्थित का नसतात? बांधकाम कामगारांचे रक्त घेते वेळेस नियमानुसार आवश्यक सुविधा व उपाय योजना का दिला जात नाहीत ? बांधकाम कामगारांची रक्ताची तपासणी केल्यानंतर रिपोर्ट का दिले जात नाही ? फक्त मंडळाकडून पैसे उकळण्यासाठी रक्ततपासणी केली जात आहे का ? तुम्ही आता कष्टकरी बांधकाम कामगारांच्या शरीरातील शिल्लक राहिलेले रक्त ही पिळून घेणार काय ? याचबरोबर थोड्याच दिवसात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होणार आहेत आचारसंहितेच्या काळात ५ हजार रुपये बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान देणार का ? आचारसंहिताच्या काळात बांधकाम कामगार विविध कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी मंडळाचे पोर्टल (वेबसाईट) सुरू राहणार आहे का ? जर आचारसंहितेच्या काळात बांधकाम कामगारांचे नोंदणी करण्यासाठी असणारे पोर्टल (वेबसाईट बंद ठेवणार असाल तर तालुका निहाय सुरू केलेले सुविधा केंद्र बंद ठेवणार आहे का ? सुविधा केंद्रात काम करण्यासाठी कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या पैसे खर्च थांबवणार आहे का ? हा जाब विचारण्यासाठी सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी, लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने 'जवाब दो आंदोलन' करण्यात आले. या संदर्भात
जबाबदार प्रशासनाचे जबाबदार सहाय्यक कामगार आयुक्त सांगली, मा. मुजम्मिल मुजावर यांनी आपल्या सही शिक्कामोर्तब करून ताबडतोब लेखी खुलासा द्यावा. जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांच्या विविध योजनांमध्ये भोंगळ कारभार सुरू असून मंडळाचे आर्थिक लोभानूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनात येत असल्यामुळे सदरचा प्रकार तात्काळ बंद न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हा, सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे, संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण भगत, जिल्हा सदस्य किशोर आढाव, मनपा क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार, पवन वाघमारे, सुनील भोसले, विशाल कांबळे , जयकर काळे, प्रविण कांबळे, नविनकुमार कांबळे, अरूण आठवले, लहरीदास कांबळे, दिनेश साबळे, सचिन कांबळे, गजानन कोळी, आप्पालाल राजरतन, मुकेश कांबळे, फिरोज डांगे, जावेद मुलाणी, महेश वाघमारे, नितीन गांधी, दिपक कांबळे, मऱ्याप्पा राजरतन, रेखा अवघडे, कांचन तुपे, सखुबाई गवळी, सोनाली भोसले, रूपाली भिसे, रेखा कांबळे, दिपाली वाघमारे , सुरेखा माने, आशा कांबळे, रेखा ढेरे, चंदा आरवाळे, भारती कलतगे यांच्या बरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰