BANNER

The Janshakti News

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा सांगली जिल्हा दौरा



 

सांगली दि. 2 (जि.मा.का.) : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शुक्रवार,  4 ऑक्टोबर 2024 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1.15 वाजता निपाणी, जि. बेळगावी येथून हेलिकॉप्टरने विटा, जि. सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1.45 वाजता बळवंत कॉलेज विटा येथील हेलिपॅडवर आगमन. दुपारी 1.50 वाजता जय माता दी लॉन विटा कडे प्रयाण. दुपारी 2 वाजता NH प्रकल्पाची पायाभरणी. दुपारी 3 वाजता बळवंत कॉलेज विटा हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 3.10 वाजता  बळवंत कॉलेज विटा हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने प्रयाण व NH-160 च्या विटा - सांगली महामार्गाची हवाई पाहणी. दुपारी 3.40 वाजता कवलापूर हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 3.45 वाजता मराठा समाज भवन कडे प्रयाण व दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन. सायंकाळी 5.30 वाजता कवलापूर हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 5.45 वाजता कवलापूर हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने प्रयाण व NH-१६६ च्या सांगली - कोल्हापूर महामार्गाची हवाई पाहणी. सायंकाळी 6.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन.

<><><<><><><><><><><><><><><><><><><>

➡️ https://youtube.com/@thejanshakatinews5707

➡️ https://www.theJanShaktiNews.in

<><><><><><><><><><><><><><><><><><>