BANNER

The Janshakti News

श्रीमंत मोटे राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्काराने सन्मानित..



VIDEO


येळावी दि. 26 : येळावी ता.तासगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत मोटे यांना नुकताच 2024 चा राज्यस्तरीय 'शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार' इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पो. नि. संजय हारुगडे व पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.



विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्यावतीने आयोजित केलेला राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार व विद्यार्थी हक्क कृती समिती सर्व पदाधिकारी मेळावा नुकताच इस्लामपुर येथे पार पडला.

महाराष्ट्र राज्य विद्यार्थी हक्क कृती समिती च्यावतीने प्रतिवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो.


यावेळी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष केदार पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी जि. प. सदस्य आनंदराव पाटील, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार व पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष अनिल माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार भगवानराव साळुंखे हे उपस्थित होते. तसेच या सोहळ्यासाठी डॉ. अतुल मोरे, प्रा. प्रदीप पाटील, चेतन पाटील, रामराजे काळे, श्रीशैल पाटील, रोहित पाटील विनोद बल्लाळ, धनाजी सापकर यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यापूर्वी श्रीमंत मोटे यांना राज्यस्तरीय समाज भूषण व राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे श्रीमंत मोटे यांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराने येळावी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


महाराष्ट्र राज्य विद्यार्थी हक्क कृती समितीच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे देण्यात येणारा 2024 चा राज्यस्तरीय 'शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार' सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत मोटे यांना मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


याप्रसंगी बोलताना श्रीमंत मोटे म्हणाले की,
मी माझ्या श्री गुरूं दत्त महाराजांच्या चरणी राहून व माझी पत्नी रुक्मिणी मोटे यांच्या सहकार्याने व माझ्या आवडीने 1995 सालापासून येळावी गावांमध्ये समाज सेवेच्या माध्यमातून गेली 31वर्ष छोटी मोठी समाजकार्य करत आहे . तसेच गेले पाच वर्षा पासून येळावी गावामध्ये स्वताच्या घरी " श्रीमंत रुक्मिणी " या नावाने विनाअनुदानित झुणका भाकर केंद्र अल्प दरामध्ये चालवत आहे. माझ्या या समाज कार्याची दखल घेऊन मला आज विद्यार्थी हक्क कृती समितीच्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांच्या साक्षीने राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित केलं त्याबद्दल विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्य यांचा मी ऋणी राहून धन्यवाद मानतो.व महाराजांच्या नावाचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी माझे भाग्य समजतो..



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖