BANNER

The Janshakti News

प्रा. दिलीप आनंदराव जाधव यांची शिक्षक महासंघाचच्या राज्य कोषाध्यक्षपदी निवड..




सांगली दि. 27  :  महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य कोषाध्यक्षपदी प्रा. दिलीप आनंदराव जाधव यांची निवड महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. सुनील डिसले बारामती व सचिव प्रा. बाळासाहेब माने मुंबई यांनी राज्य कार्यकारिणी सभेत जाहीर केली. 


         प्रा. दिलीप जाधव हे  सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गेल्या पाच वर्षांत मराठी विषय शिक्षकांना संघटित करून विविध विषयांवर आवाज उठविला होता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली आहे. ते कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहेत. नविन पुनर्रचित अभ्यासक्रम मराठी भाषा विषयतज्ञ, संशोधन लेखन साहित्यिक म्हणून  त्यांची ख्याती आहे. 
       मराठी भाषा विषयाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी, विविध उपक्रम, भाषाविषयक उपक्रमांचे संवर्धन, अभिजात दर्जा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मराठी भाषा विषय सक्तीचा व्हावा म्हणून कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे निवडीबद्दल  अभिनंदन होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖