BANNER

The Janshakti News

डि पी आय चा दणका... आंदोलनाच्या दिवशीच कर्जदार लाभार्थ्यांना 1 लाख रुपयेचा निधी वाटप...








      सांगली दि 31 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ सांगली मार्फत. थेट कर्ज, 1 लाख रुपये रक्कमेचा निधी तात्काळ मिळावा या मागणीसाठी दिनांक 30/08/2024 रोजी महामंडळ कार्यालयास कुलूप ठोक आंदोलन करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापक यांनी तातडीने वरिष्ठ अधिकारी व कार्यालयाशी संपर्क साधून आदल्या दिवशीच निधी मागवून घेतला व सांगली जिल्ह्यातील लाभार्थिना दिनांक 30/08/2024 रोजी निधी देण्याचे जाहीर केले व आंदोलन स्थगित करण्यासाठी लेखी पत्र दिले.


 डि पी आय नेते अशोकराव वायदंडे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतिश लोंढे यांनी डि पी आय स्टाईलने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला कारण की ज्या 1 लाख कर्ज प्रकरणासाठी लागणारी कागदपत्रे व त्यातील जाचक अटी लावलेल्या आहेत त्या अटी रद्द करण्यात याव्यात. व त्या मधील जाचक अट म्हणजे नोकरदार जामीनदार व शेतकरी जामीनदारांच्य लाभार्थी व जामिनदाराच्या प्राॅपर्टीवर मालमत्तेवर बोजा चढवणे .त्याच बरोबर सिबील स्कोअरची अट तातडीने रद्द करावी.व पुढील 2024 साठी 5 लाख रुपयेचे थेट कर्ज योजने मधून जाचक अटी रद्द करण्यात येऊन. मातंग समाजातील होतकरु व उद्योग व्यवसाय करणाऱ्या युवक तरुणांसाठी 25 ते 50 लाख रुपये उद्योग व्यवसायासाठी 50 टक्के सबसिडीवर देण्यात यावी. कर्ज देण्यासाठी विलंब न लावता कर्ज प्रकरणांचा 1 ते 2 महिन्यांमध्ये निपटारा करण्यात यावा. मातंग समाज व तत्सम जातीतील विध्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक अर्थसहाय्य 10 हजार ते 1 लाख रुपये पर्य़ंतचे अर्थिक सहाय्य मिळावे. बीज भांडवल कर्ज योजनेतील कर्ज प्रकरणे तातडीने मंजूर करुन देण्यात यावीत. बॅंकेकडून अडवणूक करणार्या बॅंक अधिकार्यावंर महामंडळा मार्फत कारवाई करण्यात यावी.




      इत्यादी मागण्यांसाठी प्राथमिक दृष्ट्या बोंबाबोंब आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली. जर पुढील योग्य ती कार्यवाही झाली नाही तर डेमोक्रेटिक पार्टी आॕफ इंडिया पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची शासन प्रशासन व महामंडळ प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी.अन्यथा होणाऱ्या परिणामास आपणास जबाबदार धरण्यात येईल.


यावेळी अशोकराव वायदंडे  ज.हा.ल. नेते महाराष्ट्र , सतिश लोंढे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट् , दिनकर घस्ते अध्यक्ष 
मानवेतर प्राणी व्यापारी महासंघ, संदिप काटे जिल्हा उपाध्यक्ष , बजरंग सकटे जिल्हा मार्गदर्शक , सुनिल होळकर जिल्हा उपाध्यक्ष , मानसिंग बल्लाळ 
 वाळवा तालुका कार्याध्यक्ष , विशाल नांगरे वाळवा तालुका उपाध्यक्ष , आण्णा ऐवळे उपाध्यक्ष मानवेतर प्राणी व्यापारी महासंघ,  विवेक खिलारे 
शिराळा तालुका उपाध्यक्ष , महेश केंगार मिरज तालुका उपाध्यक्ष , विकास लोंढे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा मानवेतर प्राणी महासंघ इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖