yuva MAharashtra माजी सैनिकांच्या पाल्यांकरीता शिष्यवृत्ती योजना

माजी सैनिकांच्या पाल्यांकरीता शिष्यवृत्ती योजना



        सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : सन 2023-24 या शैक्षणीक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण होवून पुढील वर्गात शिकत असलेल्या माजी सैनिक, दिवंगत माजी सैनिक पत्नीच्या / माजी सैनिकांच्या अनाथ पाल्यांना संपूर्ण / उर्वरित कालावधीकरीता शिष्यवृत्ती प्रदान करण्याकरीता संबंधितांनी दि. 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, सांगली येथे प्रत्यक्ष अथवा 0233-2990712 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖