BANNER

The Janshakti News

नागठाणे येथे बाबासाहेब लांडगे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारFull Speechसुप्रसिध्द व्याख्याते व हास्ययात्राकार शरद जाधव 


Full Speech - ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे


Full Speech -  प्रमुख पाहुणे हुतात्मा संकुलनाचे विरधवल नायकवडी

नागठाणे दि. 15 जून : शिकलेल्या माणसांनी समाजाची पडझड सुरू केली.दिखाऊ व बेगडी जीवन शैलीत जगत असताना मानवी नात्यातील संवाद हरवत चालला आहे.बाबासाहेब लांडगे आणि परिवाराने कृष्णाकाठी घातलेला संस्काराचा पाया खूप मोठा आहे.बाबासाहेबांनी निर्माण केलेला दातृत्वाचा वसा जोपा सून गावगाडा सुंदर बनवूया असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा.सर्जेराव खरात यांनी केले. ते नागठाणे (ता. पलूस) येथे बाबासाहेब लांडगे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते . कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे हुतात्मा संकुलनाचे विरधवल नायकवडी,जेष्ठ साहित्यिक प्रा. सुभाष कवडे हे उपस्थित होते.


वीरधवल नायकवडी म्हणाले की,नागठाणे गाव हे समाजाला दिशा देणारे आहे.स्व.बाबासाहेब लांडगे यांच्या परिवाराने राबविलेले उपक्रम दिशादर्शक असून हुतात्मा परिवार सर्वोतोपरी सहकार्य करेल.
 ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे म्हणाले, आजकालच्या समाजात संवेदना हरवत चालली आहे.नागठाणे येथील लांडगे कुटुंबीयांनी आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवित संवेदनशीलता जपली असल्याचे प्रतिपादन यांनी केले.
यावेळी हुतात्मा बॅकेचे व्हा. चेअरमन बाजीराव मांगलेकर, हुतात्मा साखर कारखान्याचे व्हा चेअरमन रामचंद्र भाडळकर, संरपच विजय माने, विष्णू पंतसंस्थेचे चेअरमन महादेव माने , नागठाणे विकास सोसायटीचे चेअरमन दिपक पाटील, लक्ष्मण शिंदे, आनंदराव कोरे, पोपट पाटील, बाळासो शिंदे, दयानंत कांबळे, माजी डे. सरपंच झाकीर लांडगे, तलाठी आलताफ लांडगे, ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक स्व. बाबासाहेब लांडगे पतसंस्थेचे संस्थापक गौसमंहमद लांडगे यांनी केले तर आभार माजी सरपंच रसुल नदाफ यांनी मानले. सुत्रसंचालन भिकाजी सांळुखे - पाटील यांनी मानले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖