पुणे, दि.7 : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्याने दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा विभागस्तरीय महिला लोकशाही दिन माहे जून 2024 पासून नियमितपणे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास विभागीय उपआयुक्त संध्या नगरकर यांनी कळविली आहे.
विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी तसेच महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दरमहा दुसऱ्या सोमवारी विधान भवन, पुणे येथे विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते, असेही श्रीमती नगरकर यांनी कळविले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖