BANNER

The Janshakti News

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण
सांगली दि 5 (जि.मा.का.) :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली, जिल्हा व सत्र न्यायालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालय, सांगली येथील आवारामध्ये, जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.


या कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा,  जिल्हा न्यायाधीश क्र. 1 एस.आर. भदगले, तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्र. 2 श्रीमती एस. काकडे, औद्योगिक न्यायालयाचे सदस्य डी.एम. पाटील, दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एम.एम. राव, अतिरिक्त सरकारी वकील विनायक देशपांडे यांच्या हस्ते न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी इतर न्यायिक अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖