BANNER

The Janshakti News

जगदिश कांबळे यांची वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड...




सांगली दि. २७ : जगदिश सुरेश कांबळे यांची वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली आहे.

 ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी, श्रमिक कष्टकरी कामगारांना योग्य न्याय हक्क अधिकार मिळावेत म्हणून स्थापन केलेली एकमेव अशी कामगार संघटना, म्हणजे 'वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य' या नोंदणीकृत युनियन मध्ये, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून, उच्च शिक्षित असणारे युवक मा. जगदिश सुरेश कांबळे यांची निवड करण्यात आली. त्यांना, महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी मा. सुरेश मोहिते साहेब आणि मुंबई राज्य सचिव मा. सुनील लोखंडे साहेब, मा. वेदान्त जाधव रायगड जिल्हा निरीक्षक यांच्या हस्ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर. मुंबई येथे निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी, पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे साहेब तसेच सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, यांच्या बरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


त्यांची झालेली योग्य निवडी बद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



सांगली जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश सुरेश कांबळे आपल्या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी तसेच महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी मा. सुरेश मोहिते साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आणि माझ्या पदाला न्याय देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेन, मी सांगली शहरातील एका झोपडीपट्टीत जन्माला आलोय, तेथेच लहानाचा मोठा झालो, बांधकाम क्षेत्रात घरातील सर्व सदस्य काम करीत असल्याने मी ही त्यांच्या सोबत काम करीत दोन दोन विषयांत पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले. नेट परीक्षा पास झालो. मी स्वतः आणि माझ्या घरातील सर्व जन बांधकाम क्षेत्रात काम करीत आलो असल्या कारणाने मला बांधकाम कामगारांच्या काबाडकष्टाची जाणीव आहे. मी, श्रमिक कष्टकरी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असणारे बांधकाम कामगारांची दुखणे हे माझ्या लहानपणापासून पाहात आलोय. मी ते स्वतः अनुभवले आहे . यामुळे सर्व प्रथम सांगली शहर परिसरातील तसेच जिल्ह्यातील सर्व झोपडपट्टी मध्ये राहत असणारे बांधकाम कामगारांना योग्य न्याय देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर 75 टक्के धनदांडगे, श्रीमंत, बागायतदार, नोकरदार लोकांनी बोगस नोंदणी करून, या श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांच्या हक्काच्या योजना गैर फायदा घेतला आहे. त्यांच्या तोंडचा घास हेरावून घेण्याचे मोठे पाप केले आहे. अशांची, मा. सहाय्यक कामगार आयुक्त सो यांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली जाईल व त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तरी दोषी असणाऱ्यांनी कारवाई सामोरे जाण्यासाठी तयार व्हावे, असा सावधतेचा इशारा दिला आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖