BANNER

The Janshakti News

मतमोजणीच्या अनुषंगाने मनाई आदेश जारी

 

सांगली, दि. 3 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया शांततेत, सौहार्दपूर्ण व भयमुक्त वातावरणात व नि:पक्षपातीपणे पार पडण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सांगली जिल्ह्यामध्ये तसेच कृपामाई हॉस्पीटल, मिरज ते सेंट्रल वेअर हाऊसच्या 2 कि.मी. त्रिजेच्या स्थलसीमा हद्दीत दि. 4 जून 2024 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते 23.59 वाजेपर्यंत पुढील कृत्यांना मनाई केली आहे.

या आदेशानुसार कृपामाई हॉस्पीटल, मिरज ते सेंट्रल वेअर हाऊसच्या 2 कि.मी. त्रिजेच्या आजूबाजूच्या परिसरात दोन व दोन पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगणे यास प्रतिबंध केला आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभे राहण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. वाहनांच्या सायलन्सरच्या पुंगळ्या काढून मोठमोठ्याने आवाज करण्यास मनाई केली आहे. सदर ठिकाणाच्या आजूबाजूंच्या परिसरात स्पीकर, साऊंड सिस्टीम वाजवण्यास मनाई केली आहे. इंन्स्ट्राग्राम, व्हॉटस्अप, व्टिटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमाव्दारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवण्यास मनाई केली आहे. कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकुरांचे फ्लेक्स, बोर्डस व आक्षेपार्ह घोषणा देण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖