BANNER

The Janshakti News

पलूस मध्ये शंभर रुपयाच्या स्टॅम्प चा तुटवडा





सांगली/पलूस प्रतिनिधी :      १५ मे २०२४

पलूस शहरात १०० रुपयांच्या स्टॅम्‍प पेपरचा तुटवडा

 शहरात गत काही दिवसांपासून १०० रुपयाच्या स्टॅम पेपरचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे स्टॅम पेपर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली आहे. आता खरिपाचा हंगाम तोंडावर आहे, बी-बियाणे, खते, पेरणी आणि शेतीसाठी लागणारा खर्च पाहता शेतकऱ्यांची आता पीक कर्ज काढण्यासाठी लगभग सुरू आहे.

त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह स्टॅम पेपरची शेतकऱ्यांना आवश्यकता भासत आहे. असे असले, तरी  शहरात १०० रुपयाचा स्टॅम पेपर शेतकऱ्यांना मिळत नसल्याची ओरड होत आहे.

सध्या स्टॅम विक्रेत्याजवळ स्टॅम पेपर उपलब्ध नाहीत. लायसन रिन्यू साठी गेले आहे असे कारण सांगितले जात आहे बँकेच्या कामकाजासाठी स्टॅम्प दिले जात नाहीत यासाठी लोकांना भटकावे लागत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना स्टॅम पेपर उपलब्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी असल्याने त्यांना आपले सर्व कामे बाजुला सावरत स्टॅम पेपर मिळविण्यासाठी सध्या भटकंती करावी लागत आहे.

लोकांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे याबाबत रजिस्टर कार्यालयाकडून मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖