BANNER

The Janshakti News

कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रात एका दिवसात १७ महिलांवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया ; क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड यांनी डॉक्टर व कर्मचार्‍यांचा केला सत्कार..






कुंडल : वार्ताहर               11 MAY 2024

कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रात एका दिवसात १७ महिलांवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्या, या शस्त्रक्रिया झाल्यावर क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.

कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवार दि. ९ मे रोजी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित योजनांचा कॅम्प पार पडला. यामध्ये आतापर्यंत कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रात उच्चांकी शस्त्रक्रिया झाल्या.

यावेळी शरद लाड म्हणाले, या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम नेहमीच पथदर्शक असते. रुग्णांची संख्या नेहमीच जास्त असल्याने रुग्णांचा विश्वास येथील कर्मचारी आणि व्यवस्थावणावर जास्तीचा आहे. आम्ही आजवर या आरोग्य केंद्राला लागेल ती मदत केली आहे यापुढे ही करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित योजनेअंतर्गत एकूण 43 गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली अति जोखीमेच्या मातांना योग्य सल्ला देऊन, रक्त वाढीच्या व कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात आल्या. धनुर्वाताचे इंजेक्शन त्याचबरोबर इतर शासनाच्या योजनांचे अनुषंगिक मार्गदर्शन ही करण्यात आले.

यावेळी नातेवाईकांकडून ही सत्कार डॉ. सुनंदा पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय पाटील, डॉ.ऐश्वर्या चौगुले, डॉ.पूजा जगताप, सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व सामुदायिक आरोग्य अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.


कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा सत्कार करताना शरद लाड, उपसरपंच अर्जुन कुंभार, सदस्य किरण लाड, आणि रुग्णांचे नातेवाईक.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖