BANNER

The Janshakti News

निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणूक कामकाजाचा सूक्ष्म आढावा ; निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या यंत्रणांनी अधिक सतर्क व दक्ष रहावे




 

         सांगली, दि. 4 (जि.मा.का.) : सांगली लोकसभा मतदार संघात येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे.  उद्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असून त्यानंतरचा कालावधी महत्वाचा आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भय, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व यंत्रणांनी अधिक सर्तक व दक्ष रहावे, अशा सूचना ४४-सांगली लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या  कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत निवडणूक जनरल निरीक्षक परमेश्वरम बी. पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि निवडणूक खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी दिल्या. या बैठकीस निवडणूक पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार कालावधी संपल्यानंतर राज्य व जिल्हा सीमा नाक्यांवर संशयित वाहनांची कडक तपासणी करण्यात यावी. यासाठी एसएसटी व एफएसटी पथकांनी दक्षता घ्यावी व निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आपणांस दिलेले कर्तव्य बजावावी, अशा सूचना जनरल निरीक्षक परमेश्वरम बी. यांनी दिल्या.
मतदान संपण्यापूर्वी शेवटचे ७२ तास, ४८ तास आणि २४ तास महत्वाचे आहेत.  या कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस यंत्रणेने गस्ती पथकामार्फत रात्रीचे पेट्रोलिंग वाढवावे, अशा सूचना निवडणूक पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिल्या. या काळात कम्‍युनिटी हॉल, मंगल कार्यालये, लॉज, गेस्‍टहाऊसची कसून तपासणी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

 


सांगली लोकसभा निवडणुकीचा प्रचार कालावधी संपल्यानंतर होणाऱ्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी गठित  पथकांनी जागरूक व दक्ष रहावे, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी दिल्या.

 


जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सादरीकरणाद्वारे निवडणूक व  मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी केलेल्या उपाय योजनांची तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कायदा व सुव्यवस्था संदर्भात माहिती दिली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖