BANNER

The Janshakti News

पलूस येथील समर्थ स्कूल येथे मंगळवारपासून आनंद अनुभूती शिबिरपलूस प्रतिनिधी   :           20 MAY 2024


पलूस दि. 20 : आर्ट ऑफ लिव्हिंग शाखा पलूस यांच्या वतीने हॅपिनेस प्रोग्राम- आनंद अनुभुती शिबीर आयोजित केले आहे .दिनांक  21 मे ते 26 मे अखेर   संध्याकाळी 6 ते 9या वेळेत श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल पलूस येथे हे शिबीर आयोजित केले आहे .प्रशिक्षक आनंदराव बोराडे डॉ राजन कामत , वर्षाराणी पुदाले हे आहेत. संयोजन   सूर्यकांत चव्हाण ,  सुहास पुदाले, संदीप सावंत, राहुल पाटील, सौ.संजीवनी  सूर्यवंशी ,धनाजी मोहिते, सुशांत कोले,प्रशांत पाटील   व संयोजक करीत आहेत.या शिबिराविषयी बोलताना आनंदराव बोराडे म्हणाले या शिबिरामध्ये पूरक हालचाली, योगासने, प्राणायाम, ध्यान आणि लाखो लोकांच्या जीवनात बदल घडविणारी सुदर्शन क्रिया शिकवण्यात  येणार आहे .कोर्सपासून तणावमुक्त व उत्साही मन ,नकारात्मक भावनांपासून मुक्तता,शारीरिक व्याधी दूर होऊन शरीर निरोगी राहते.

डॉ राजन कामत म्हणाले या शिबिरामध्ये आत्मविश्वासात वाढ,रागावर नियंत्रण मनाची एकाग्रता,रोग   प्रतिकारक क्षमता कार्यकुशलता आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. दैनंदिन जीवन सहज सुकरपणे पार पाडण्यासाठी आपल्याला मदत होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖