BANNER

The Janshakti News

शासकीय अपंग बालकगृह व शाळा मिरज येथे मोफत प्रवेश सुरू


शासकीय अपंग बालकगृह व शाळा  मिरज येथे मोफत प्रवेश सुरू

 


        सांगली, दि. 10 (जि.मा.का.): शासकीय अपंग बालकगृह व शाळा  किल्ला भाग मिरज येथे 1 ली ते 10 वी साठी मोफत प्रवेश सुरू असून इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश नोंदवावा. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय 6 ते 14 वर्षे, अस्थिव्यंग प्रवर्ग (हात/पायाने अपंग असलेली बालके), जिल्हा शल्य चिकित्सकांचा किमान 40 टक्के अपंगत्वाचा दाखला आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिक्षक, शासकीय अपंग बालकगृह व शाळा, किल्ला भाग, मिरज दुरध्वनी क्र. 0233-2222513 व भ्रमणध्वनी क्रमांक 9552097241, 9422216459 यावर संपर्क साधावा, असे शाळेच्या अधिक्षकांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖