भिलवडी , १५ मे : सांगली जिल्ह्या पलूस तालुक्यातील वसगडे गावच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
हा मृतदेह वसगडे गावचे हद्दीत शिवाजी ऊर्फ शशीकांत बाळासो पाटील यांचे शेत जमीन गट नंबर ६७२ मधील पडीक जमीनीमध्ये काट्याच्या झाडात आढळला असून संबंधित मृत व्यक्तीचं वय साधारणतः 40 ते 45 च्या दरम्यान असल्याची माहिती मिळाली आहे.
या व्यक्तीचा दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून याबाबत अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
पोलिसांनी या घटनेची नोंद
अकस्मात मयत अशी रजिस्टर दाखल करून घेतली असून पोलीसांकडून मृत्यूमागचं गुढ उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भिलवडी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,
काल १४ मे रोजी सकाळी पावनेआकरा वाजण्याच्या सुमारास शिवाजी ऊर्फ शशीकांत बाळासो पाटील हे वसगडे हद्दीत कॅनॉल नजिक असणार्या आपल्या शेतातील बांधावरुन जात असताना त्यांना दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. बांधाला लागून असणाऱ्या त्यांच्या पडीक जमीनीकडे नजर गेली असता त्यांनी काट्याच्या झुडपात हा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ भिलवडी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर, हा मृतदेह पडीक जमीनीमध्ये काट्याच्या झाडात सडलेल्या, कुजलेल्या अवस्थेत पडला होता. तर परिसरात दुर्गंधीही सुटली होती. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची अगदी बारकाईनं पाहणी केली. मृतदेहाची अतिशय वाईट अवस्था पाहून पोलिसांनी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन केले.
यावेळी विभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्यासह खटाव चे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
वर्णन : वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, पुरुष जातीचे, चेहरा कुजलेला दोन्ही हात पाय काळवडंलेले, अंगात निळे रंगाचा बरमुडा, डावे पायात काळे रंगाचा विनलेल्या दोर्याचा कंडा.
पोलीसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात असून
संबधित व्यक्ती बाबत काही माहीती मिळाल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी केले आहे.
१. तपास अधिकारी नितीन सावंत सहा पोलीस निरीक्षक भिलवडी पोलीस ठाणेमो नं ९८९२७८४४२९२. दुरध्वनी क्रमांक भिलवडी पोलीस ठाणे ०२३४६-२३७२३३
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖