कोडोली वार्ताहार : 13 MAY 2024
मुरगुड़ ता. कागल येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांनी बातमी दिल्याच्या रागातून शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेखान जमादार तसेच त्याचे साथीदार आसिफ खान जमादार व संदीप सणगर यांनी मारहाण केली होती.
या घटनेचा निषेध करुन या मारहाण प्रकरणातील संशयित आरोपी यांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी दलित महासंघ (वायदंडे गट) यांच्या वतीने कडोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
संबधित आरोपीवर तात्काळ कडक कारवाई न झाल्यास दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर मधुकर वायदंडे व राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहिल असा ईशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी दलित महासंघाचे पन्हाळा तालुका युवक आघाडी अध्यक्ष सागर लोंडे , राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड , अनिल बोंडवे यांच्यासह आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार प्रकाश तिराळे मारहाण प्रकरणी पत्रकार संघाने पुकारलेल्या आंदोलनास दलित महासंघाच्या (वायदंडे गट) वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.अशी माहिती पन्हाळा तालुका युवक आघाडी अध्यक्ष सागर लोंडे यांनी दिली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖