BANNER

The Janshakti News

पलूसकर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 99.32 टक्के


पलूस : प्रतिनिधी               २७ मे २०२४सांगली/पलूस : पंडित विष्णू दिगंबर  पलूसकर माध्यमिक विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. इयत्ता दहावीचा निकाल 99.32 टक्के लागला.एकूण 148 विद्यार्थी या परीक्षेसाठी पलूसकर माध्यमिक विद्यालयातून बसले होते. यापैकी 147 विद्यार्थी उतिर्ण झाले. विशेष गुणवत्तेत  67 विद्यार्थी  तर प्रथम श्रेणीत 47 विद्यार्थी उतिर्ण झाले.   प्रथम  क्रमांक भाग्येश अनिल भूमकर (96%) , द्वितीय  क्रमांक कु.योगिता अशोक सिसाळ (95.60 %) , तृतीय क्रमांक कु. तेजस्विनी बंडू इरकर (93.40%) गुण मिळवून या तीन विद्यार्थ्यांनी  घवघवीत यश संपादन केले. तर  
कु.संचिता संदीप सूर्यवंशी (92%) , कु.प्राजक्ता बाळासाहेब पाटील (91.60%) , कु.अस्मिता अतुल पाटील (91.60%) यांनी उल्लेखनीय यश मिळवले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे,उपाध्यक्ष विश्वास रावळ,सचिव जयंतीलाल शहा, संचालक सुनिल रावळ,संजय  परांजपे, शंतनू  परांजपे, मुख्याध्यापक तानाजी करांडे , सर्व संचालक , शिक्षक, पालक यांनी हार्दिक अभिनंदन केले.
        
  माध्यमिक  विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.पलूसकर  विद्यालयाचा निकाल दहावीचा सलग उच्चांकी निकाल लागला.सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक  तानाजी करांडे , आनंदराव सावंत, गजानन पाटील, सुनिता कोळी, बळीराम पोतदार, मिलिंद शिरतोडे, बाळासाहेब चोपडे,, सुनील पुदाले, विकास कांबळे , संदीप सावंत,प्रमोद माळी, प्रिती नरुले,प्रज्ञा बिराज, अमिता कुलकर्णी, तृप्ती पाटील सर्व शिक्षक,शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖