BANNER

The Janshakti News

स्टार स्वंरोजगार प्रशिक्षण संस्थेमध्ये मतदार जनजागृती मेळावा


 

सांगली दि. 13  (जि.मा.का.) : येत्या 7 मे रोजी सांगली जिल्ह्याकरिता लोकसभेचे मतदान होणार असून या दिवशी मतदात्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी केले .


 बॅंक ऑफ इंडिया (BIO) स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था ( आरसेटी ) सांगली येथे 10 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थीचा लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने श्री वेताळ यांनी मतदार जनजागृतीच्या उद्देशाने कार्यक्रम घेतला यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले 7 मे रोजी सर्वानी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी आपला हातभार लावावा .

  यावेळी आरसेटी निदेशक (सांगली) महेश पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावर सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थींनी आम्ही सर्व जण मतदान करणार असल्याचे सांगितले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆