yuva MAharashtra जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतला निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतला निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा


 

सांगली दि. 13  (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक २०२४ साठी ४४- सांगली लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी मतदान होणार असून यंत्रणांनी निवडणूक संदर्भातील सर्व कामकाज वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना करून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.


जिल्ह्यात लोकसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया  सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व संबधित नोडल अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली.

बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल आदी सहभागी झाले होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी VIS डाउनलोड, छपाई आणि वितरण, मतदान कर्मचारी दुसरे प्रशिक्षण, EVM VVPAT दुसरे सरमिसळ, AMF मतदानाच्या दिवशी कडक उन्हाळा लक्षात घेऊन विशेष व्यवस्था, निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदान कर्मचाऱ्यांना रोखरहित उपचार, SST, FSS, VVT,  MCC,1950  Cvigil,  निवडणूक साहित्य व्यवस्थापन, ईव्हीएम,वाहतूक योजना, होम बेस मतदान, पोस्टल मतपत्र, EDC,मतपत्रिका छपाई, स्वीप संदर्भातील कामकाजाचा जिल्हाधिकारी यांनी तालुकानिहाय निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीस सर्व संबधित तालुक्याचे नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी उपस्थित होते.

हेही पहा ----




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆