BANNER

The Janshakti News

भारती विद्यापीठस् न्यू लॉ कॉलेज सांगली येथे कायदेविषयक शिबिर संपन्न





सांगली दिनांक १५.०४.२०२४:-

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई, गांवेकडील कॉमन मिनिमम प्रोग्रॉग एप्रिल-२०२४ नुसार आज दिनांक १५.०४.२०२४ रोजी सकाळी ९.३० ते ११.०० यावेळेमध्ये जिल्ला विधी सेवा प्राधिकरण सांगली व भारती विद्यापीठस् न्यू लॉ कॉलेज सांगली, यांचे संयुक्त भारती विद्यापीठस् न्यू लॉ कॉलेज सांगली, येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करणेत आले होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. पूज्जा नरवाडकर, प्राचार्या भारती विद्यापीठस् न्यू लॉ कॉलेज सांगली घांनी केले, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.पी. के. नरहरले सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली है होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री प्रविण नरडेले, अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांची कार्ये, मध्यस्थी प्रक्रिया तसेच लोकअदालत प्रकिया याविषयी उपस्थित विधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे वको श्री. चंद्रकांत साळुंखे, कामगार अधिकारी सांगली यांनी १८ वर्षाखालील बालकांकडून कोणतेही बालमजूरीयी कामे करून घेणे हा कायदयाने गुन्हा आहे, असे बालमजूर आपणास कोठेही कामे करताना आढळून आल्यास बालकामगार आयुक्त सांगली या कार्यालयास संपर्क साधणेधावतचे आव्हाग उपस्थितांना केले. दुसरे तक्ते श्री. आनंदराय उबळे, पोलीस उपनिरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा सांगली यांनी बालतस्करी हा फार मोठा सामाजिक प्रश्न असल्याचे सांगितले तसेच हरवलेल्या मुलांचा शोध घेणे कामी ऑपरेशन मुश्कान ही केंद्र शासनाची योजना संपूर्ण देशभर जुलै महिन्यामध्ये राबविले जाते या मोहिमेमध्ये हरवलेल्या/पळुन गेलेल्या मुलांचा शोध घेउन सापडलेली मुले आई-वडीलांच्या ताब्यात दिली जातात असे त्यांनी सांगितले,


कार्यकमाचे सुत्रसंचालन श्री अब्दुल बासिद मुएल्म, विधी विद्यार्थी व आभार प्रा. श्री. संजीवकुमार साथले यांनी मानले. सदर कार्यकाचे नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व भारती विद्यापीठस् न्यू लॉ कॉलेज सांगली, यांनी केले.

हेही पहा ----





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆