BANNER

The Janshakti News

महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते


सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्याचा 65 व्या स्थापना दिनाचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ बुधवार, दिनांक 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड विश्रामबाग, सांगली येथे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आईवडील यांनी उपस्थित रहावे. ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर उपस्थित रहावे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणतीही पिशवी सोबत आणू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

      अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी नागरिकांनी वेबसाईटव्दारे होणारे थेट प्रक्षेपण पहावे.  मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी  दि. 1 मे  रोजी सकाळी 7.15 ते 9 वाजेपर्यंतच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 7.15 च्या पूर्वी  किंवा सकाळी 9 वाजल्यानंतर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖