BANNER

The Janshakti News

पलूस मध्ये मतदार जागृती अभियानांतर्गत मॅरेथॉन रॅली संपन्न 
                            VIDEO  पलूस दि. ३ : 7 मे 2024 रोजी सांगली लोकसभा मतदारसंघात लोकसभेचे मतदान होत असून हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी प्रशासन पातळीवर जोरदार प्रबोधन मोहीम राबवली जात आहे. 


याचाच एक भाग म्हणून मंगळवार दि.२ एप्रिल रोजी पलूस शहरात प्रशासनाच्या वतीने पलूस तहसील कार्यालयापासून,पलूस पोलीस स्टेशन ते नवीन एसटी स्टँड पर्यंत मॅरेथॉन रॅली काढण्यात आली. या मॅरेथॉन  रॅली ची सुरुवात तहसील कार्यालयापासून पलूसच्या तहसीलदार दीप्ती रेटे यांनी झेंडा दाखवून केली. या मॅरेथॉन रॅलीमध्ये पलूस तहसीलदार दीप्ती  रिठे, निवडणूक नायब तहसीलदार परदेशी सर,नायब तहसीलदार मनोहर पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप पाटील,नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे, केंद्रप्रमुख किरण आमणे, केंद्रप्रमुख राम चव्हाण, शिक्षक नेते मारुती शिरतोडे, नितीन चव्हाण,पंडित विष्णू दिगंबर हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी करांडे , बाळासाहेब खेडकर,विनोद आल्हाट,संतोष खेडकर,अमोल कोळेकर यांच्यासह तहसील कार्यालय पंचायत समिती कर्मचारी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे म्हणाले की स्वीप कार्यक्रमांतर्गत पलूस तालुक्यातील आजच्या मॅरेथॉन रॅलीमध्ये पंचायत समिती तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच इतर विभागातील कर्मचारी,शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.तसेच आम्ही संपूर्ण पलूस तालुक्यामध्ये स्वीप कार्यक्रमांतर्गत युवक,युवती प्रौढ वृद्ध जे जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदानासंदर्भात जागृती करण्याचे प्रयत्न गेली दोन महिने करीत आहोत. शाळा महाविद्यालयातून या संदर्भात रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, विद्यार्थी रॅली ,सायकल रॅली असे उपक्रम घेतले आहेत. 
 या लोकसभेला मतदानाची टक्केवारी वाढावी आणि पलूस तालुक्यात उच्चांकी मतदान व्हावे यासाठी प्रशासनाचा जास्तीत जास्त प्रयत्न सुरु आहे. मॅरेथॉन रॅलीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी हातात बॅनर घेऊन मतदार जागृती संदर्भात घोषणा दिल्या. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. आपले मतदान आपले भविष्य अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेवटी आभार नोडल अधिकारी प्रकाश कांबळे यांनी मानले आणि रॅलीची सांगता झाली.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆