BANNER

The Janshakti News

विट्यात भर वस्तीत गादी कारखान्याला भिषण आग...



विट्यात भर वस्तीत गादी कारखान्याला भिषण आग...

सांगली : खानापूर तालुक्यातील विटा येथील विवेकानंदनगरात एका गादी बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. 

 भर वस्तीत आज दि.१२ रोजी सायंकाळच्या सुमारास ही हि घटना घडली. सदरची घटना समजताच स्थानिक प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. 

 पुरुषोत्तम भानुशाली यांचा हा कारखाना कराड रस्त्यावर आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

या कारखान्यामध्ये कापडी चिंद्यापासून कापूस आणि त्यापासून गाद्या बनवण्यात येत होते. आज सायंकाळी अचानक या गादी कारखान्याला आग लागल्याने तत्काळ विटा पालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्याचबरोबर बामणी येथील उदगिरी शुगर कारखान्याच्या अग्निशमन बंबालाहि पाचारण करण्यात आले.

आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर बाहेर येत होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. विटा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. भरवस्तीत कारखाना असल्याने मदत कार्यात अडचण येत होती. सध्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे,अशी माहिती विटा पोलिसांनी दिली आहे.

हेही पहा ---

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆