BANNER

The Janshakti News

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन





लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

सांगली दि.  19 ( जि.मा.का.) : निवडणुकीच्या अनुषंगाने लाच देणे-घेणे, उमेदवारांना, मतदारांना, कोणत्याही व्यक्तीला इजा पोहचवणे, धमकावणे भारतीय न्याय संहितेच्या कलम १७१ बी व कलम १७५ सी नुसार गुन्हा आहे. असे गुन्हे करणारी व्यक्ती, दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, किंवा आर्थिक दंड अथवा दोन्ही शिक्षा याप्रमाणे संबधित शिक्षेस पात्र राहील.

             जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात तक्रार नियंत्रण कक्ष २४ तास सुरु असून निवडणुकीचे अनुषंगाने, लाच देण्या - घेण्याबाबत तसेच धमकावल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली तर त्वरित १८००२३३१८०९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून जिल्हा निवडणूक अधिकारी यांना माहिती देता येईल. त्याचबरोबर C-VIGIL ॲपवर फोटो/व्हिडीओसह तक्रार दाखल करता येईल.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षाच्या mcc.sangli@gmail.com या मेल आयडीवर तसेच नागरिकांना जिल्हा स्तरावरील तक्रार नियंत्रण कक्ष (२४ x ७) येथेही समक्ष येऊन तक्रार दाखल करता येईल. अशी माहिती आचार संहिता कक्षाच्या नोडल अधिकारी तथा निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

        येत्या ७ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत प्रत्येकाने मतदान करा आणि देशाची लोकशाही समृद्ध करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

##################################


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

##################################