BANNER

The Janshakti News

मनूश्री महिला संस्थेमार्फत अनाथ महिलांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप ; मनूश्री संस्थेमार्फत महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा..


=====================================
=====================================

जत : वार्ताहर             दि. १७ मार्च २०२४

  जत : मनुश्री महिला बहुउद्देशीय विकास मंडळाच्या वतीने जि.प.शाळा गावडे वस्ती जत येथे महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी दरवर्षी प्रमाणे कुणाचीही साथ नसतांना कष्ट करुन जीवण जगणाऱ्या  ११ महिलांना गृहपयोगी किराणा साहित्य , साडी आणि  रोख रक्कमेचे पाकीट व गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला.त्या बरोबर शाळेतील मुलींचाही  गुलाब पुष्प देवून सत्कार केला. सर्व  विद्यार्थ्यांना  खाऊ वाटप केले. 


    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डाॕ.सौ.रूपाली शिनगारे मॕडम यांनी उपस्थित महिलांना आरोग्या विषयी मार्गदर्शन  केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्यध्यापिका सौ.संगिता येळेकर मॕडम यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

  या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेच्या सचिव सौ. नयना सोनवणे यांनी संस्थेच्या विविध कार्याची माहिती दिली. संस्थेने आत्तापर्यंत बालकामगार शाळेतील मुलांना युनिफॉर्मचे वाटप , मूकबधिर  व मतिमंद शाळेतील शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके पेन खाऊ वाटप,महिलांना मार्गदर्शन शिबिर,केरळ येथील झालेल्या भूकंपामध्ये व सांगली,मिरज महापुराच्या वेळी संस्थेमार्फत निधी संकलन करून मदत करण्यात आली.यावेळी संस्थेचे उपाध्यक्षा सौ.नम्रता सुर्यवंशी मॕडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमास संस्था सदस्या श्रीमती राजश्री शिंदे, सौ विमल जाधव, सौ भावना कोळी, सौ प्रमिला साळुंखे यांचेसह शाळेचे विद्यार्थी,शिक्षक,पालक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


    सर्वांचे आभार सौ. सावंत मॕडम यांनी मानलेत. या कार्यक्रमासाठी श्री. बी.टी.सोनवणे सर, श्री. एन.एम.सुर्यवंशी सर.श्री.नेताजी  शिंदे, प्रज्वल शिंदे, दिगंबर साळुंखे सर यांचे सहकार्य  लाभले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags