BANNER

The Janshakti News

नावापेक्षा कामातून आपली ओळख निर्माण केली तर ती जास्त काळ टिकते ... आमदार अरुण लाड


======================================
======================================

कुंडल : वार्ताहर         दि.२ मार्च २०२४

शिक्षकांनी कामाचे तास न मोजता देशसेवा म्हणून अविरत कार्यरत रहा यातून तुमच्या हातून देशसेवा घडेल असे प्रतिपादन आमदार अरुणअण्णा लाड यांनी केले.

ते गांधी एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिनिधी हायस्कुलचा मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा योजनेतून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन कार्यक्रमात बोलत होते. जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड अध्यक्षस्थानी होते.

आमदार लाड म्हणाले, नावापेक्षा कामातून आपली ओळख निर्माण केली तर ती जास्त काळ टिकते. शिक्षाकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षा देताना ती त्यांच्या मनाला लागावी अशी द्यावी यातून त्यांना चूक लक्षात येईल व ती सुधारतील. शिक्षकांनी अध्यापन करताना पूर्ण अभ्यासपूर्वक करावे. त्यासाठी शिक्षकाने आधी शिक्षक व्हावे तरच मुलं, विद्यार्थी होतील.

अनुदानित शिक्षण संपण्याच्या मार्गावर आहे, याला शासन धोरण कारणीभूत आहे. कारकुनी शिक्षणापासून बाजूला होऊन स्पर्धा परीक्षेसाठी सज्ज असा विद्यार्थी तयार करा. मुलांना पुस्तकी किडा न बनवता तंदुरुस्त पिढी घडावी यासाठी मैदानी खेळ मुलांना खेळुद्या. स्वर्गीय क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंना चांगली पिढी सर्वगुण संपन्न हवी होती ती आपण घडवूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अध्यक्षस्थानावरून किरण लाड म्हणाले, प्रतिनिधी हायस्कुलने जे काम केलं त्यात सातत्य ठेवल्याने हा जिल्ह्यातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन पण यात सातत्य ठेवून भविष्यात विद्यादानाच्या कार्यक्रमात प्रगती करून नवीन पिढी सुसंस्कारी आणि गुणवंत घडवावी.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रताप लाड यांनी केले, सूत्रसंचालन सर्जेराव खरात यांनी केले तर आभार मोहन पुजारी यांनी मानले.

यावेळी मुख्याध्यापक सी.वाय.जाधव, सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच अर्जुन कुंभार, कुंडलिक एडके, प्राचार्य आर.एस.डुबल, गोविंद डुबल, सी.एल.रोकडे, वसंत लाड, ग्रामसेवक महादेव यल्लाटी, सदस्या आक्काताई सोळवंडे, सुगंधा एडके, विजया सावत, मनीषा लाड यांचेसह प्रतिनिधी हायस्कुल, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

प्रतिनिधी हायस्कुल, कुंडलचा मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा योजनेतून जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल आमदार अरुणअण्णा लाड शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना.

हेही पहा ----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Tags