BANNER

The Janshakti News

बार्टीच्या धरतीवर आर्टीची स्थापना ; निर्णयाचे दलित महासंघाचे वतीने जल्लोषात स्वागत...


=====================================
=====================================

 कराड वार्ताहर :                दि. ३ मार्च २०२४
   
        महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाच्या अस्मितेचा आणि भावी पिढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे "बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करणे" हा होता. त्यासाठी दलित महासंघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आर्टीच्या स्थापनेसाठी रस्त्यावरची लढाई सुरू होती. काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांनी विधानसभेमध्ये बार्टीच्या धरतीवर आर्टीची स्थापना केल्याचे जाहीर केले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये  मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
         मातंग समाज हा महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील दोन नंबरची लोकसंख्या असलेला समाज आहे. परंतु बार्टीच्या माध्यमातून या समाजावर अन्याय होतोय अशी मातंग समाजाची भावना होती. त्यातूनच आर्टीच्या स्थापनेचा मुद्दा गेली काही वर्ष चर्चेत होता. महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून आर्टीची स्थापना झालेली आहे. अर्थातच यामध्ये दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. दलित महासंघाने १ जानेवारी २०२१ पासून आर्टीच्या स्थापनेचा मुद्दा लावून धरलेला होता. त्यासाठी राज्यभर आंदोलने केली होती. अखेर दलित महासंघाच्या मागणीला आणि आंदोलनाला यश मिळाले असून आम्ही सर्वजण या आर्टी स्थापनेचा आनंद व्यक्त करीत आहोत. आणि महायुती सरकारचे अभिनंदन करीत आहोत.


कराड तहसीलदार कार्यालयासमोर दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते,जयवंत सकटे,सुरज घोलप, संजय तडाखे,प्रा.दिपाली वाघमारे, हरिभाऊ बल्लाळ, अभियंता आघाडीचे राहुल वायदंडे,कु.जाई प्रकाश, जयसिंग वायदंडे,मधुकर मोरे,विजय वायदंडे,सौ.सितारा वायदंडे,कु.स्नेहल, शांताराम लोखंडे, संग्राम वायदंडे,शाहू वायदंडे आदींनी फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆