BANNER

The Janshakti News

जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने रामानंदनगर येथील नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये : अख्तर पिरजादे



15 दिवसापासून रामानंदनगरला पाणीपुरवठा नाही , 
पाण्याविना माताभगिनींचे अतोनात हाल...
         
                               VIDEO




=====================================
=====================================

रामानंदनगर : प्रतिनिधी      दि. ३ मार्च २०२४

जिल्हा परिषद जीवन प्राधिकरण विभागाअंतर्गत कुंडल प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून जवळपास 13 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु गेले पंधरा दिवस झाले या परिसरामध्ये पाणी नाही.वीज वितरण ने जॅकवेल वरून पाणीपुरवठा होतो तेथे  वीज कनेक्शन तोडल्याने वीज पुरवठा बंद होता. परंतु वीज बिला पोटी काही रक्कम भरल्याने  मंगळवारपासून तो पाणीपुरवठा रामानंदनगर व्यतिरिक्त इतर गावांना सुरळीत पणे सुरू आहे.याचा रामानंदनगर मधील नागरिक बंधू-भगिनींना खूप त्रास सहन करावा लागत आहे. रामानंदनगर येथील नागरिकांचा सहनशीलतेचा कृपया अंत पाहू नये असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अख्तर पिरजादे आणि संदीप वाघमारे यांनी व्यक्त केले.
 
 या स्थितीबद्दल विचारणा केली असता रामानंदनगर ग्रामपंचायत मधून पाणीपट्टी भरली जात नसल्याचे पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे अभिजीत गुरव यांनी सांगितले.त्यामुळे इतर गावांना पाणीपुरवठा सुरू आहे आणि रामानंदनगरचा सुरू नाही. ही बाब निश्चित पणाने खेदजनक आहे. याचा आम्ही तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो. कारण रामानंदनगर गावांमध्ये राहणारे ही सुद्धा माणसेच आहेत.त्यांना पाण्यापासून वंचित ठेवणे हे चुकीचे आहे. दरवर्षी पाणी पट्टी भरणारी 50% हून अधिक जण या गावांमध्ये राहतात. त्यांच्यावर हा अन्याय आहे. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीकडे जी पाणीपुरवठ्याची जबाबदारी दिली आहे. ती काढून पूर्वी प्रमाणे जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा करावा. अशी मागणी करणार असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले. ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरळीत पणे पाणीपुरवठा होत नाही.नागरिकांनी  वेळच्यावेळी पाणीपट्टी भरलेली असतानाही काही वेळा ग्रामपंचायत कडून ही ती पाणीपट्टी वेळेत भरली जात नाही. याचा सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे. लोकप्रतिनिधींनी आमदार,खासदारांनी कृपया या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत च्या वॉट्सअप ग्रुपवर 
शुक्रवारी सांगण्यात आले की नेहमीप्रमाणे रविवारपासून पाणीपुरवठा सुरळीतपणे होणार आहे. असे कळवले असतानाही अचानक  शनिवारी रात्री मेसेज करण्यात आला की मोटार नादुरुस्त झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद आहे.  ही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याकडून धुळफेक करण्यात आली आहे. कोणतीही मोटार नादुरुस्त नव्हती.जॅकवेलमध्ये बिघाड नाही, पाईप लाईन ची गळती नाही.असे असतानाही  चुकीचा मेसेज पाठवून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. इतर गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होतो आणि रामानंदनगर गावावरतीच अन्याय का? कुंडल प्रादेशिक योजनेत अंतर्गत असणाऱ्या सर्व गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रामानंदनगर ला मात्र 15 दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे.


सर्व गावांना पाणीपुरवठा होतो 
परंतु रामानंदनगरला का नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.  वर्षातील एकूण 365 दिवसा पैकी 100 दिवस देखील सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नाही.आठ दिवसाला दहा दिवसाला ही योजना बंद पडलेली असते. योजना सुरू झाली की कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रामानंदनगरचा पाणीपुरवठा बंद असतो. पाणी पट्टी मात्र संपूर्ण 1800 रुपये भरून घेतली जाते. या सर्व प्रश्नावर लवकरच आंदोलन छेडणार असल्याचा इशारा  सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे आणि संदीप वाघमारे यांनी दिला.यावेळी  कृष्णा मिठारी, ओंकार सोरटे, सुमित जाधव, अनिकेत सावंत उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags