BANNER

The Janshakti News

वसंत मोरे आणि प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं ? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं !




मुंबई दि. 29 : वसंत मोरे यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची  भेट घेतली. या भेटीत नेमकं काय होणार?, वंचितकडून पुणे लोकसभेसाठी वसंत मोरेंना उमेदवारी मिळेल का?, असे अनेक तर्कवितर्क लढवले गेले. ‘प्रकाश आंबेडकरांशी सकारात्मक चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिली आहे. त्यानंतर येत्या 31 तारखेला सगळं चित्र स्पष्ट होईल, असं प्रकाश आंबेडकांनी म्हटलं आहे. 

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

तात्यांसोबत चर्चा झाली. दुसरी महत्त्वाची चर्चा व्हायची आहे. जे काही अधिकृत सांगायचं आहे, ते 31 तारखेपर्यंत कळवेन. महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि कोण कोण करेल हे अधिकृतपणे 31 किंवा 1  तारखेपर्यंत सांगितलं जाईल. काही चर्चा ओपन करु शकत नाही. कारण सध्या घडामोडी घडत आहेत. राजकीय स्तरावर नाहीत पण सोशल पातळीवर, गावपातळीवर सुरु आहेत. त्या चर्चांना एक रुप येण्यासाठी दोन तीन दिवस जातील. त्यानंतर महाराष्ट्राचं नवं समीकरण समोर येईल. आजची चर्चा त्याअनुषंगाने झाली. ग्रामीण आणि शहरी पातळीवर जे काही घडतंय ते दोन-चार दिवसात समोर येईल. सर्वांची उत्तरं मिळतील. मविआकडून आवाहन केलं जातंय, पण जे काही होतंय त्याबाबत दोन तारखेपर्यंत थांबा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

वसंत मोरे काय म्हणाले? 

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक सकारात्मक झाली. येत्या दोन तीन दिवसात निर्णय होईल, तो निर्णय सर्वांना कळवला जाईल, असं वसंत मोरे म्हणाले आहे. प्रकाश आंबेडकरांची भेट घेण्यापूर्वी  ‘मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. आणि काहीही झालं तरी मी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं वसंत मोरे म्हणाले होते. त्यामुळे आता वसंत मोरेंना वंचितकडू उमेदवारी मिळते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. येत्या 31 मार्च किंवा 1 एप्रिलपर्यंत स्पष्ट होणार आहे.

 वंचितच्या उमेदवाराकडे सर्वांचं लक्ष

प्रकाश आंबेडकरांना भेटण्यापूर्वी वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव यांच्या ऑफिसवर जाऊन भेट घेतली होती. पुण्यात ही भेट झाली होती. वंचित बहुजन आघाडीने 2019 मध्येही पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार दिला होता. अनिल जाधव यांना 2019मध्ये उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या लोकसभेच्या निवडणुकीसाठी वंचितकडून डॉ. अभिजित वैद्य यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात काय होईल आणि वंचितचा उमेदवार कोण असेल?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆