yuva MAharashtra 'फंगल इन्फेक्शन'ची कारणे काय?

'फंगल इन्फेक्शन'ची कारणे काय?



=====================================
=====================================


 'फंगल इन्फेक्शन'ची कारणे काय?

फंगल इन्फेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इन्फेक्शन एका काळानंतर पुरते हैराण करून सोडते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो? याबाबत आज पाहुयात...

कारणे काय? :

● उष्ण आणि दमट वातावरणामुळे ही समस्या होते.

● ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन         होण्याची शक्यता जास्त असते.

● ओले कपडे घालणे.

● घट्ट शूज किंवा कपडे घालणे.

● खुप वेळ मोजे घालणे.

● वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेणे.

● प्रतिजैविक औषधांचे दुष्परिणाम

● कमजोर रोगप्रतिकार शक्ती

1. कँडीडा अल्बिकन्स : हे एक फंगल इन्फेक्शन असून ते त्वचेवर, तोंडाजवळ गुप्तांगाजवळच्या ओलसर त्वचेवर होते. 

2. रिंगवर्म :  हे सुद्धा एक फंगल इन्फेक्शन आहे. जे प्रामुख्याने त्वचेवर, डोक्याच्या त्वचेवर, पायांना, मांडीवर आणि गुप्तांगाजवळ होते.

काय काळजी घ्यावी? :

◼️ वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या.

◼️ स्नानगृह किंवा सार्वजनिक आंघोळीच्या                          ठिकाणी स्वच्छता बाळगा.

◼️ सतत एकच मोजे घालू नका.

◼️ खूप घट्ट शूज घालू नका.

◼️ कोणाचीही वस्तू वापरू नका.

◼️2.5 PH चे ॲसिडीक पाणी दिवसातुन 3-4 वेळा              बाधित जागेवर स्प्रे करावे.

संकलन- 
निसर्ग उपचार तज्ञ 
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. 
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags