BANNER

The Janshakti News

जायंट्स ग्रुप चा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या पंखात बळ..


======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर                   दि. १६ मार्च २०२४

  वाढदिवसाचा खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होवू शकतात. हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडी यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके व खाऊ वाटप करून आदर्श उपक्रम राबविण्यात आला.

 
 महापुरामुळे बोरबन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बरेच साहित्याचे नुकसान झाले आहे त्यामुळे शाळेतील मुलांसाठी विविध प्रकारची पुस्तके वाचण्यासाठी लागणार असल्याची कल्पना शिक्षक श्री राजेंद्र कांबळे यांनी यापूर्वीच जायंट्स पदाधिकाऱ्यांकडे  दिली होती, त्यामुळे जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडीने शुक्रवार दिनांक 15 मार्च रोजी जायंट्स ग्रुपचे उपाध्यक्ष श्री महावीर चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेसाठी विविध प्रकारची पुस्तके भेट देऊन व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करुन श्री महावीर चौगुले यांचा वाढदिवस साजरा केला.
 
  यावेळी शिक्षक राजेंद्र कांबळे यांनी शाळेच्या वतीने महावीर चौगुले यांचा शाल ,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

  यावेळी चितळे उद्योग समूहाचे उद्योजक श्री. गिरीश चितळे जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष श्री सुबोध वाळवेकर , माजी उपसरपंच महादेव मोरे , बाळासो महिंद-पाटील ,  सुनील परीट , के. आर. पाटील , सचिन मगदूम, सतीश चौगुले,  व ग्रामस्थ उपस्थित होते.

 या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे सामान्य गरीब शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील आहेत. शिक्षक श्री राजेंद्र कांबळे व शिक्षिका सौ किणीकर मॅडम यांच्या अथक परिश्रमातून या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप त्याचप्रमाणे विविध स्पर्धा परीक्षेत उज्वल यश प्राप्त केले आहे. 


  याप्रसंगी बोलताना चितळे उद्योग समूहाचे उद्योजक श्री. गिरीश चितळे यांनी शाळेस विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

हेही पहा ----





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆