BANNER

The Janshakti News

वंचितची दुसरी लोकसभा उमेदवार यादी जाहीर , 11 जणांचा समावेश , यादीमध्ये प्रत्येक उमेदवाराच्या नांवापुढे जातीचा उल्लेख..




मुंबई दि. 31: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. या उमेदवार यादीमध्ये एकूण 11 जणांचा समावेश आहे. 

वंचितच्या पहिल्या यादीप्रमाणेच दुसऱ्या यादीतही समाजातील सर्व जाती-घटकांना स्थान मिळेल, याची काळजी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे वंचितच्या दुसऱ्या यादीतही लोकसभा उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जात नमूद करण्यात आली आहे. 

वंचितच्या पहिल्या लोकसभा उमेदवार यादीत 8 जणांचा समावेश होता, तर दुसऱ्या उमेदवार यादीत 11 जणांचा समावेश आहे. त्यामुळे वंचितने आतापर्यंत लोकसभेचे 19 उमेदवार जाहीर केले आहेत. 

महाविकास आघाडीसोबत युतीची बोलणी सुरु असताना प्रकाश आंबडेकर यांनी लोकसभेच्या 27 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे विजय मिळवण्याइतपत ताकद असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आतापर्यंत वंचितने 19 लोकसभा उमेदवार जाहीर केले आहेत. 

वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या यादीतील लोकसभेचे उमेदवार कोण?

हिंगोली – डॉ. बी डी चव्हाण   – बंजारा

लातूर – नरसिंग उदगीरकर – मातंग

सोलापूर – राहुल काशिनाथ गायकवाड – बौद्ध

माढा – रमेश नागनाथ बारसकर – माळी (लिंगायत)

सातारा – मारुती धोंडीराम जानकर – धनगर

धुळे – अब्दुर रहमान – मुस्लीम

हातकणंगले – दादासाहेब दादागौडा चौगौडा पाटील – जैन

रावेर – संजय पंडीत ब्राम्हणे – बौद्ध

जालना – प्रभाकर देवमन बकले – धनगर

मुंबई उत्तर मध्य – अबुल हसन खान – मुस्लीम

रत्नागिरी सिंधुदुर्ग – काका जोशी – कुणबी

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆