BANNER

The Janshakti News

युवकांचे मजबूत संघटन करणार ; सुधाकर वायदंडे यांचे प्रतिपादन


दलित महासंघाच्या युवा संपर्क अभियानास कुरळपमधून सुरवात

======================================
======================================

वाळवा/कुरळप : वार्ताहर   दि. २९ फेब्रुवारी २०२४

समाजाच्या विविध प्रश्नासाठी दलित महासंघाच्या माध्यमातून युवकांचे मजबूत संघटन करणार असल्याचे प्रतिपादन दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर मधुकर वायदंडे यांनी केले.
               कुरळप येथून दलित महासंघाच्यावतीने दिवंगत प्रा.मधुकर वायदंडे यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून युवा संपर्क अभियानास सुरवात करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
                   सुधाकर वायदंडे म्हणाले,युवकांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित मागण्यासाठी युवक बंधुंची एकजुटीची ताकद निर्माण करून संघटना अधिक गतिमान करणार आहे. युवकांना योग्य मार्गापासून भरकटू न देता रोजगाराची व व्यवसायाची संधी शासनाने उपलब्ध करून देण्यासाठी लढा उभा करणार आहे यासाठी हे राजकारण विरहित युवा संपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे.


           दलित महासंघ ही लढाऊ व आक्रमक सामाजिक संघटना आहे समाजावर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही.
          दलित महासंघाच्या शाखा वाढीसाठी प्रयत्न करणे,अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे,विविध सामाजिक समस्यावर आंदोलन करणे,सर्व शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकाला मिळवून देणे, आदिवासी व बहुजन समाजाला तसेच शोषित, पीडित,वंचित घटकाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी दलित महासंघ काम करत असल्याचे सुधाकर वायदंडे यांनी सांगितले.
           दलित महासंघाचे सदाभाऊ चांदणे,सुनिल मोरे सर,शामराव क्षीरसागर आप्पा,युवा नेते उत्तम वायदंडे,संभाजी मस्के,नारायण वायदंडे,प्रविण वायदंडे,प्रभाकर तांबीरे,चिरंजीव मोरे,राजू वायदंडे,सचिन वायदंडे,सत्कारसिंह गायकवाड,सुजित वारे,भटक्या जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष गुलाब सय्यद,टारझन पवार,अवि भोसले, जहांगीर पवार,भीमराव घाटे,संतोष शिंदे,लखन घाटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆