BANNER

The Janshakti News

विजय माने यांना आदर्श कामगार पुरस्कार...=====================================
=====================================

कुंडल : वार्ताहर           

पलूस तालुक्यातील कुंडल ग्रामपंचायतीचे कर्मचारी विजय माने यांना आरोग्य व स्वच्छता विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच त्यांना सन २०२२-२३ चा आदर्श कामगार पुरस्कार  देण्यात आला.

हा पुरस्कार क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

 विजय माने यांना आदर्श कामगार पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरूण अण्णा लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच अर्जुन कुंभार, ग्रामविकास अधिकारी महादेव यल्लाटे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.


विजय माने यांचा सन्मान करताना क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

 
Youtube Link

👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags