BANNER

The Janshakti News

भिलवडीत " शिवउत्सव " धुमधडाक्यात साजरा...


                                VIDEO




=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर १९ फेब्रुवारी२०२४

भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इंग्लिश मिडियम स्कूल, भिलवडी यांच्या वतीने आज १९ फेब्रुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून "शिवउत्सव" कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत भिलवडी ता.पलूस येथे करण्यात आले.

राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांची घोड्यावरून पारंपारिक हलगी वाद्यासह गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले सर्व विद्यार्थी यांच्या सह पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



ग्रामपंचायतच्या भव्यपटांगणावरती विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच सौ. विद्याताई पाटील , ग्रामपंचायत सदस्य सौ .सीमा शेटे , सौ. लीना (वहिनी) चितळे, प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे व के जी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता माने यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सिनिअर के.जी. वर्गातील विद्यार्थ्यांनी शिवगर्जना, शिवस्तुती, शिवप्रेरणा मंत्र, महाराजांच्या सभ्यतेची व प्रसंगावधानाची माहिती देणारे भाषण , महाराजांच्या शौर्याची पराक्रमाची गाथा सांगणारे पोवाडे , प्राचीन मर्दानी खेळ लाठी-काठी , लेझीम नृत्य यांसारख्या विविध प्रकारांमुळे शिवप्रेमाने ओतप्रोत भरलेले सर्व वातावरण शिवमय झाले होते.


तसेच ग्रामपंचायत भिलवडी व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण डीसले यांच्या वतीने यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी संचालक डॉ. सुनील वाळवेकर , सर्व ज्ञात अज्ञात पदाधिकारी, भिलवडी पोलीस स्टाफ, सर्व पत्रकार , फोटोग्राफर , सर्व ग्रामस्थ , सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा बाबर यांनी केले तर आभार सौ मीनाक्षी चौगुले यांनी मानले.

हेही पहा ----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆