VIDEO
=====================================
=====================================
भिलवडी : वार्ताहर 1 Feb 2024
भातुकली हा लहान मुलांचा आवडीचा खेळ हीच संकल्पना घेऊन दरवर्षी भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडीयम स्कूल, भिलवडी (ता.पलूस) मध्ये बाहुला बाहुली चे लग्न लावले जाते. तीच परंपरा कायम ठेवत या वर्षी बुधवार दि.३१/१/२०२४ रोजी " बाहुला बाहुलीचे लग्न सोहळा " शाळेच्या आवारात मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडला.
या निमित्ताने शाळा एका मंगल कार्यालयासारखी सजवली होती. या सजावटीसाठी सर्व मुलांचा प्रत्यक्ष सहभाग हे या लग्नाचे मुख्य आकर्षण, त्यामध्ये मुलांनी पताका चिकटवणे, बाहुला बाहुलीसाठी मुंडावळ्या बनवणे अशा उपक्रमांमधून आपले कलाकौशल्य दाखवले.
लग्नादिवशी सर्वप्रथम बाहुला, बाहुली व पाहुण्यांचे स्वागत पारंपारिक पद्धतीने औक्षण करून केले त्यानंतर लग्न समारंभातल्या सर्व विधी यथासांग पार पाडल्या. त्यामध्ये अक्षता रोपण,व-हाडाची शाळेच्या आवारातून वरात काढण्यात आली यावेळी मुलांनी भोजनाचा आस्वाद घेत उत्साहात व आनंदात बाहुला बाहुलीच्या लग्नाचा समारंभ पार पाडला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता माने टिचर , सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆