परीसरातील अनेक गावातील गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा घेतला लाभ.
====================================
====================================
भिलवडी : वार्ताहर दि. 16/02/2024
------------------------------------------------------------------
लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तासगांव , शहिद जवान फाऊंडेशन खंडोबाचीवाडी , व सिग्मा आय केअर माळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.15 फेब्रुवारी रोजी हनुमान मंदिर खंडोबाचीवाडी ता.पलूस येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.
या शिबिरात हृदयविकार, मधुमेह, फुफ्फुसाचे विकार, पोटाचे विकार, दमा, काविळ, सर्पदंश, स्नायुंचे आजार, फिट येणे, हर्निया, मुळव्याध, पित्ताशयातील खडे, गुडघेदुखी, वयस्कर लोकांचे लघवीचे आजार, अपेंडिक्स, पोटाच्या व इतर शस्त्रक्रिया याबरोबरच मोफत डोळे तपासणी व अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया BP, Sugar, ECG मोफत तपासणी, गरजू लोकांची मोफत रक्त तपासणी करण्यात आले.
या शिबिरात भिलवडी, माळवाडी, धनगाव, आमणापूर, भिलवडी स्टेशन सह परिसरातील गरजू रुग्णांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली.
ज्या गरजू रुग्णांकडे सवलत कार्ड आहे अशा रुग्णांना केसपेपर व तपासणी विनाशुल्क असून बालरोग विभाग, मेडिसीन विभाग, ऑर्थो विभाग, सर्जरी विभाग, ऑन्कोलॉजी (कॅन्सर) विभाग, मानसोपचार विभाग, दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियांची मोफत तपासणी
केली जाणार असल्याची माहिती यावेळी संयोजकांनी दिली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शहिद जवान फाऊंडेशनचे संस्थापक ॲड. चैतन्य वावरे, अध्यक्ष सागर कापसे , सर्व पदाधिकारी व सदस्य , अनिकेत चेंडगे , विशाल शिंदे , गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत शिंदे , सरपंच सौ.अश्विनी मदने शहिद जवान फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी यांच्या सह लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व खंडोबाचीवाडी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆