yuva MAharashtra उध्दव ठाकरेंंना मोठा धक्का ; खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच ..विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

उध्दव ठाकरेंंना मोठा धक्का ; खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच ..विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर



=====================================
=====================================
२१ जून २०२२ रोजी प्रतिस्पर्धी गट तयार झाला तेव्हा शिंदे गट हाच खरा शिवसेना राजकीय पक्ष होता. यामुळे शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचे कोणतेही कारण नाही, असे स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी करणाऱ्या ठाकरे गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या.

शिंदे गटाच्या १६ आमदारांना २१ जून २०२२ रोजी पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल अपात्र ठरवण्याचे कोणतेही कारण नाही, असे राहूल नार्वेकर यांनी निकालवाचन करताना म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचा गट खरी शिवसेना आहे, असाही निकाल त्यांनी दिला आहे. हा निकाल उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिंदे गटाच्या आमदारांना पक्षविरोधी कारवायांसाठी, पक्षशिस्त न पाळल्याबद्दल आणि असहमती व्यक्त केल्याबद्दल अपात्र ठरवता येणार नाही, असे नार्वेकर यांनी म्हटले. आमदार प्रकरणी सर्व याचिका फेटाळल्या जात असून शिवसेनेच्या कोणत्याही गटातील कोणीही आमदार अपात्र नाही, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील तब्बल चार महिन्यांच्या कामकाजानंतर बुधवार दि. १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. शिंदे गटाने दिलेली १९९९ ची घटना हीच शिवसेनेची घटना आहे, असे स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २०१८ ची घटना वैध मानण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका फेटाळली. कोणत्याही नेत्याला पक्षातून हटविण्याचा अधिकार शिवसेना ‘प्रमुखां’कडे नाही, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. यामुळे उद्धव ठाकरे गटाला आमदार अपात्रता प्रकरणात मोठा धक्का बसला आहे.

माझ्यासमोरील पुरावे आणि नोंदी पाहता, प्रथमदर्शनी असे सूचित होते की २०१३ आणि २०१८ मध्ये कोणत्याही निवडणुका झाल्या नाहीत. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या २७ फेब्रुवारी २०१८ च्या पत्रातून दिसलेली शिवसेनेची नेतृत्व व्यवस्था ही संबंधित नेतृत्व व्यवस्था आहे जी कोणता गट खरा राजकीय पक्ष आहे हे ठरवण्यासाठी विचारात घेणे आवश्यक आहे, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

हेही पहा ----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags