BANNER

The Janshakti News

नागठाणे येथील आदर्श प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार उत्साहात संपन्न..



=====================================
=====================================
   
पलूस/नागठाणे : वार्ताहर  दि. २१ जानेवारी २०२४
     
नागठाणे :  सन्मान शिक्षण संस्था सुखवाडी, संचलित ,आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे (ता.पलूस) येथे शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी चिमुकल्यांचा आठवडी बाजार/ खाऊ गल्ली हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
      कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक व स्वागताने झाली. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा. कै. संजय यादव सर यांना आदरांजली वाहून मुख्याध्यापक श्री .सुनील मोरे सर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा सल्लागार समितीचे सदस्य मा.जयवंत बापू मदने मा.श्री आप्पालाल संदे हे उपस्थित होते. 


 या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री महेंद्र शिंदे, श्री.समीर मुल्ला, श्री. गणेश यादव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
       प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतांमध्ये श्री संजय यादव सर यांच्या आठवणींना उजाळा देत  शाळेसाठी नेहमीच सहकार्याची भावना राहील  अशी ग्वाही दिली आणि विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार भरवण्यामागचा उद्देश स्पष्ट करत, विद्यार्थ्यांना बाजारासाठी शुभेच्छा दिल्या.
          प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आठवडी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले .यावेळी महिला पालक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते .
         विद्यार्थ्यांचे गणिती ज्ञान, व्यावसायिक ज्ञान, खरेदी- विक्री ,नफा- तोटा या संकल्पना दृढ होण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमांमधून अपेक्षित हेतू साध्य झाल्याचे  दिसून आले. 
       भाजीपाला फळे ,खाऊचे पदार्थ इत्यादींची बाजारामध्ये रेलचेल होती. प्रत्येक विद्यार्थी आपला माल कसा खपेल यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते.


          चिमुकल्यांच्या उत्साहाने गजबजलेल्या या बाजारात सहा. शिक्षिका सौ. रागिणी धनवडे मॅडम ,सौ. राजनंदिनी माने मॅडम, श्री केशव गायकवाड सर यांच्यासह सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी ,व्यवस्थापन समितीचे सदस्य, माता पालक- शिक्षक पालक संघाचे सदस्य ,तसेच सर्व माता भगिनी व पालक उपस्थित होते  .
            एकंदरीतच आठवडी बाजार हा उपक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆