BANNER

The Janshakti News

भारताच्या संविधानाचे चार स्तंभ न्यायपालिका, कार्यपालिका, विधायक, मीडिया ; भारताच्या संविधानाचे संरक्षण व जनजागृती करणे हेच आमचे उद्दिष्ट ....प्रतिभा शेलार



======================================
======================================

सातारा वार्ताहर :     दि. १७ जानेवारी २०२४

साताऱ्यातील महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ प्रतिभा शेलार या सामाजिक कार्यात अग्रेसर असतात तसेच विविध उपक्रम ही सामाजिक राबवत असतात महिलांचे घरगुती प्रश्न सोडवणे समाजामध्ये अन्याय घडलेला असेल त्यावर आवाज उठवणे असे भरपूर काही विषय यांवर प्रतिभा शेलार या आवाज उठवून तो विषय मार्गी लावतात. तसेच वैद्यकीय शिबिर लावणे. हाही उपक्रम ते राबवत असतात तसेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नृत्यांगना गौतमी पाटील ही नृत्याच्या माध्यमातून अश्लील डान्स करत होती त्यामुळे समाजामधील युवा पिढी व पुरुषवर्ग विचलित होऊन गुन्हेगारी वाढत होती त्यामुळे गौतमी पाटील विरोधात सातारा सत्र न्यायालय मध्येही  प्रतिभा शेलार त्यांनी गुन्हा दाखल करून सातारा,सांगली कोल्हापूर येथे तिचे कार्यक्रम बंद करण्यात आले     

सर्वात महत्त्वाचं म्हणजे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानाची घटना लिहून आपल्या भारतामध्ये न्यायव्यवस्था सुरळीत ठेवावी यासाठी भारताच्या संविधान लिहून गेले त्या प्रमाणे भारताच्या संविधानाची भारतातील प्रत्येक नागरिकांना सन्मान करण्यासाठी सांगून गेले व त्याप्रमाणे न्यायव्यवस्था राखून ठेवावी असेही बोलले आहे .


महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार भारताच्या संविधानावर माहिती सांगणे व भारताच्या संविधानाचे संरक्षण करणे व जनजागृती करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे भारतातील किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय अधिकारी ,मंत्री, पोलीस अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर, पत्रकार, सरपंच असे अनेक शासकीय अधिकारी भारताच्या संविधानाची प्रस्तावना भेट देऊन त्यांचा सत्कार करणे व भारताच्या संविधानाची त्यांना आठवण करून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे हा उपक्रम पाच वर्षापासून आतापर्यंत ते करतच आहेत यापुढेही असेच करत राहणार आहेत. आणि भारताच्या संविधानाची आठवण प्रत्येक शासकीय अधिकारी पासून सर्व प्रत्येक व्यक्तीला करून देणार आहेत कोणीही संविधानाच्या विरुद्ध वागू नये व संविधानाचा सन्मान करावा हाच त्यांचे उद्दिष्ट आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆