BANNER

The Janshakti News

सार्वजनिक वाचनालय व महाविद्यालयास उद्योजक गिरीश चितळे यांनी दिले मराठी विश्वकोशाचे खंड भेट=====================================
=====================================

सांगली / भिलवडी (ता.२) : १ जानेवारी 2024 रोजी सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे 49 वा वाचन कट्टा उपक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वाचनालयाचे अध्यक्ष उद्योजक गिरीश चितळे होते.
 यावेळी वाचन कट्टा उपक्रमाचे प्रमुख संयोजक सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून वाचन कट्टा उपक्रमाचा आढावा घेतला.
 मी वाचलेला दिवाळी अंक या विषयावर उपस्थित वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया विस्ताराने व उदाहरणासहित स्पष्ट केल्या.
   यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये
 
एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात मुलींच्या मध्ये प्रथम आलेल्या शैलजा चव्हाण हिचा गिरीश चितळे यांचे हस्ते ग्रंथ भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. 


 तसेच आदर्श माता पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. वैशाली चव्हाण , शिखरजी यात्रा यशस्वी पूर्ण केल्याबद्दल दिव्यांग बांधव संजय चौगुले , वसप कथा संग्रहाचे लेखक महादेव माने यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन करण्यात आला.
 
 भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरू असलेल्या ग्रंथ भेट अभियानास वाचन कट्टा समूहाच्या वतीने वीस पुस्तकांचा संच भेट देण्यात आला तसेच सार्वजनिक वाचनालय व बाबासाहेब चितळे महाविद्यालयास मराठी विश्वकोशाचे खंड गिरीश चितळे यांनी भेट दिले.

 यावेळी बोलताना सुभाष कवडे म्हणाले की  १ फेब्रुवारी रोजी सुवर्ण महोत्सवी वाचन कट्टा विविध उपक्रमांनी संपन्न होणार आहे. हा सुवर्ण महोत्सवी वाचन कट्टा वाचनालयाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय काकासाहेब चितळे यांना समर्पित करण्याचे सर्वानुमते ठरले आहे. 

 यावेळी नोव्हेंबर महिन्यात वाचनालयात जमा झालेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते.

 याप्रसंगी प्रा. डॉ. दीपक देशपांडे , रमेश चोपडे , डी आर कदम , तुकाराम पाटील , महादेव जोशी , सौ उर्मिला डिसले , माजी न्यायमूर्ती जगन्नाथ माळी , वाचनालयाचे ग्रंथपाल काटीकर , सेवक सौ. मयुरी नलवडे , सौ. विद्या निकम , विश्वस्त जी जी पाटील यांच्यासह अनेक वाचक सभासद उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केले तर डी आर कदम यांनी आभार मानले. 
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆