BANNER

The Janshakti News

बुरुंगवाडी | विद्यमान सरपंच माजी उपसरपंच व सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश..



======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर                दि.१९ जानेवारी २०२४

पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी (ब्रम्हानंदनगर) येथील भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ.अस्मिता लखन बनसोडे व माजी उपसरपंच श्री.शिवाजी शंकर तावदर, श्री.सुनील वसंतराव माळी आणि माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.लखन बनसोडे, श्री.विजय रमेश तांदळे , श्री.संजय हणमंत जाधव यांनी आमदार अरुण (अण्णा) लाड व जिल्हा परिषदेचे माजी गटनेते व क्रांती अग्रणी डॉ. जी.डी.बापू लाड सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. शरद (भाऊ) लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गटात) प्रवेश केला. 
  
 येणाऱ्या काळात आमदार अरुण लाड व शरद लाड  यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासात्मक कामाने जनतेचा विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास सरपंच सौ.अस्मिता बनसोडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


 मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशानंतर क्रांतीअग्रणी डॉ. जी डी (बापू) लाड यांच्या समाधीचे सर्वांनी दर्शन घेतले यावेळी क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, व्हा. चेअरमन दिगंबर पाटील, माजी जि.प सदस्य नितीन नवले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पलूस तालुकाध्यक्ष मोहन पाटील , सतीश पाटील,पोपटराव फडतरे,विनायकराव महाडिक, दीपक मदने,शितल बिरनाळे, ज्ञानेश पाटील,अर्जुन जाधव, विनोद पानबुडे, दिपाली पाणबुडे, स्वाती जाधव, संजय जाधव, विशाल शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags