yuva MAharashtra जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर काय होते वाचा.

जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर काय होते वाचा.



=====================================
=====================================


खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे.

हे आहेत दुष्परिणाम ---

 चक्कर येणे 
भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते.

ताण-तणाव
भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो.

लठ्ठपणा वाढतो
भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केल्यास, वेळी-अवेळी खाल्लास, वजन वाढते, म्हणजे लठ्ठपणा वाढतो... वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते व फॅट्स शरीरात जमा होतात, यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. तेव्हा वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तरं, भूक लागेल तेव्हा वेळेवर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि किमान 20 मिनिटे व्यायाम करा...

मेंदूचे कार्य बिघडते 
ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण करा. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी खालावते. लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते.

चिडचिड
भुकेमुळे जास्त चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदूप्रमाणे तुमच्या मूडवर याचा परिणाम होतो...

सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया|
*सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःख भागभवेत्|

संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Tags