BANNER

The Janshakti News

श्री सायन्स अकॅडमी भिलवडी यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान...
=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर                दि.०१ जानेवारी २०२४
 
   भिलवडी येथील श्री सायन्स अकॅडमीच्या वतीने नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील विश्वजित शामराव पाटील याने एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या दुय्यम साहाय्यक निबंधक परीक्षेत खुल्या गटातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल त्यांचा श्री सायन्स अकॅडमीचे संस्थापक मुकुंद पाटील व सौ.मनिषा मुकुंद पाटील यांच्या हस्ते मानाचा फेटा , शाल , श्रीफळ , गुलाबपुष्प व चांदीचे नाणे देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.


भिलवडी येथील श्री सायन्स अकॅडमी येथे हा सत्कार सोहळा पार पडला.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा देखील या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. 

यामध्ये रणजित शामराव पाटील यांची  शासकीय आयटीआय इन्स्ट्रक्टर मध्ये निवड झाले बदल त्यांचा देखील यावेळी  मानाचा फेटा , शाल , श्रीफळ , गुलाबपुष्प व चांदीचे नाणे देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी बजावल्याबद्दल श्री सायन्स अकॅडमीची विद्यार्थ्यींनी कु.गीतांजली गजानन मोहिते यांचा तसेच १० वी आणि १२ वी परीक्षेत उत्तुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यींनीचा व इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार यावेळी मुकुंद पाटील , मनिषा पाटील , शिल्पा पाटील व ज्योती पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 


    मी कासवाच्या गतीने प्रगती केली आहे.. असे नाही की मी अचानक या ठिकाणी पोहचलोय..सक्सेस हे हळूच मिळते आणि हळूच मिळालेले सक्सेस हे मोठे असते...असे मत विश्वजित पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

या सत्कार समारंभासाठी शामराव पाटील माजी मुख्याध्यापक नवेपारगाव , आप्पासो पाटील संचालक पाडळी पारगाव पाणीपुरवठा , सर्जेराव पाटील संचालक हाऊसिंग सोसायटी पारगाव यांच्यासह आदि मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. 
  कार्यक्रमाचे आयोजन श्री सायन्स अकॅडमीच्या वतीने करण्यात आले होते.
   विश्वजित पाटील यांच्या मार्गदर्शनातून श्री सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना व पंचक्रोशीतील युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा मिळावी यासाठी हा सत्कार समारंभ आयोजित केला असल्याचे यावेळी बोलताना मुकुंद पाटील यांनी सांगितले.

 या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सौ. मनिषा पाटील यांनी केले तर आभार मुकुंद पाटील यांनी मानले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆