BANNER

The Janshakti News

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून पुणे ते कोल्हापूर रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणासह विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी..



=====================================
=====================================  

सांगली वार्ताहर :  दि. २६ डिसेंबर २०२३

पुणे ते मिरज दरम्यान सुरू असणार्‍या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाच्या कामाची व इतर आवश्यक त्या सुविधांची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी पाहणी केली.

पुणे ते कोल्हापूर दरम्यान रेल्वे मार्गाची पाहणी करण्यासाठी महाव्यवस्थापक यादव हे सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी लोणंद रेल्वे स्थानकापासून विशेष रेल्वेतून या पाहणीला सुरूवात झाली. यावेळी महाव्यवस्थापक यादव यांनी पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील दुहेरीकरण, विद्युतीकरण, रेल्वे सुरक्षा कक्ष, रेल्वे गेट, रेल्वे पूल, रेल्वे फलाट, क्वॉटर्स, प्रवासी वेटींग रूम, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इत्यादींची पाहणी केली. तसेच मॉडेल रेल्वे स्थानकामध्ये समावेश करण्यात आलेल्या मिरज रेल्वे स्थानकासह अमृत भारत योजने अंतर्गत विकास करण्यात येणार्‍या लोणंद, वाठार, सातारा, कराड, सांगली, हातकणंगले आणि कोल्हापूर इत्यादी सर्व स्थानकांची त्यांनी पाहणी केली.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆