BANNER

The Janshakti News

कुंडलमध्ये काम केलेला शासकीय कर्मचारी राज्यभर उजळूनच निघतो...आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक सचिन पाटील


=====================================
=====================================

कुंडल : वार्ताहर             दि. २६ डिसेंबर २०२३

कुंडलमध्ये काम केलेला शासकीय कर्मचारी राज्यभर उजळूनच निघतो कारण इथे आमदार अरुणअण्णा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय सेवकांना आत्मीयतेची, आपुलकीचे मार्गदर्शन मिळते, त्यामुळेच आम्ही प्रशासकीय सेवेत घडलो असे मत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक सचिन पाटील यांनी व्यक्त केले.

ते कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्यावर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक तात्यासाहेब वडेर, सतीश पाटील, प्रदीप लाड, अधिक थोरबोले, विनायक महाडिक, दीपक मदने, श्रीकृष्ण पाटील, विशाल शिंदे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, तुम्ही लावाल ती दिशा गावाला मिळत असते त्यामुळे तुमची जबाबदारी खूप मोठी आहे. तुम्ही लोकांना चांगली सेवा आजवर दिली म्हणून तुम्हाला शासनाने पुरस्कार दिला आहे, ईथुनपूढे या पुरस्काराला साजेल असेच काम कराल आणि शासनाचा निधी योग्य प्रकारे खर्ची करून, दर्जेदार काम करण्यासाठी तुम्ही तत्पर असणे गरजेचे असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी शरद लाड म्हणाले, सत्काराचे ओझे न मानता ती जबाबदारी समझली तर कामात सुसूत्रता येते. तुम्ही शासन आणि जनतेचे दुआ आहात ही जबाबदारी सक्षमपणे तुम्ही सांभाळावी यासाठी लागेल ती मदत आम्ही करू.

यावेळी ग्रामसेवक सचिन पाटील, रवींद्र गायकवाड, महादेव यल्लाटी, स्वप्नगंधा बाबर, अजीज जमादार, अशोक पवार, सोमनाथ मेटकरी, प्रकाश माळी, संग्राम सुतार, मनीषा कांबळे, योगराज शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.


शासनाकडून पुरस्कार मिळायला दहा वर्षे लागली पण क्रांती समूहाने आमचा सत्कार दहा दिवसांच्या आत घेतला यातून आमदार अरुणअण्णा लाड यांची शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील आत्मीयता दिसते... महादेव यल्लाटी, ग्रामसेवक कुंडल.


आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांसोबत शरद लाड आणि मान्यवर
हेही पहा ----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆