BANNER

The Janshakti News

भिलवडी येथे आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने १६ डिसेंबर " विजयी दिवस " साजरा...


1971 मध्ये झालेल्या  भारत-पाकिस्तानच्या  युध्दातील शहिद जवानांना श्रध्दांजली....





======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर                  दि. १६ डिसेंबर २०२३

 १६ डिसेंबर,हा दिवस देशभरात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी १९७१ साली भारताने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळविला होता. या घटनेला आज ५२ वर्ष पुर्ण झाली आहेत.युध्दात भारताच्या तिन्ही दलाने पराक्रम गाजवित पाकिस्तानला पराभूत केले होते. १९७१ च्या ऐतिहासिक युध्दातिल पराक्रमाची आठवण करून भारतीय सैन्याच्या साहसाला सलामी देण्याकरीता व युध्दात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या, अमर जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्याकरीता आज पलूस तालुक्यातील भिलवडी येथील आजी-माजी सैनिक संघटने च्या वतीने आजी-माजी सैनिक कार्यालय भिलवडी येथे "१९७१ विजय दिवस" साजरा करुन अमर जवानांना मानवंदना देण्यात आली.

  यावेळी भिलवडी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत , गोपनीय विभागाचे जाधव  ,आजी-माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष कयूम पठाण ,  खजिनदार उत्तम गोविंद कांबळे , सलीम मुल्ला , संतोष मगदूम, सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील , मुस्लिम समाजाचे अध्यक्ष चया जमादार यांच्या सह आदि मान्यवर उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆