BANNER

The Janshakti News

सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना क्रांतिअग्रणी पूरस्कार प्रदान





======================================
======================================

कुंडल:वार्ताहर

क्रांतिसिह नाना पाटील, डॉ जी डी बापू लाड यांचे केवळ कौतुक करण्यापेक्षा ते कसे जगले त्याचे अनुकरण केले तर त्यांना खरी आदरांजली होईल. ते जसे जगले तो विचार मी आज इथून घेऊन जातोय असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी काढले.

ते कुंडल (ता.पलूस) येथे क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त क्रांतिअग्रणी पुरस्कार त्यांना प्रदान करणेत आला त्या पुरस्काराला उत्तर देताना बोलत होते. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड प्रमुख उपस्थित होते.

त्यांना हा पुरस्कार, त्यांनी सातारा जिल्ह्यातील एका लहान गावातिल शेतकरी कुटुंबात जन्मून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून, ऑक्सिजन देणारे वृक्ष लावणे ही काळाची गरज ओळखून त्यांनी "सह्याद्री देवराई" ही संस्था स्थापन करून या संस्थेच्या माध्यमातून 10 लाखांवर वृक्षारोपण केले आणि त्यांचे संगोपन ही केले. सुरुवातीपासूनच थिएटर आणि चित्रपटांबाबतच्या रुचीने एक उक्तृष्ठ अभिनय करत फिल्मफेअर सर्वोकृष्ट खलनायक, सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता अशा पुरस्कारांनी सन्मानित केलेले पण खऱ्या आयुष्यात एक उक्तृष्ठ नायक म्हणून नावारूपाला आलेने पुरस्कार दिला गेला.
या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र,शाल, श्रीफळ असे होते.

सयाजी शिंदे म्हणाले, मला बोलण्यापेक्षा काम करायला आवडते. आजवर ज्यांना हा पुरस्कार दिला गेला ते अत्युच्च पात्रतेचे असल्याने आज माझा ही या पुरस्कारांच्या माळेत मला ओवलं गेलं यामुळे मी मला भाग्यवंत समजतो. आजवर मी ज्या भूमिका केल्या त्यातून समाजातील खदखद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण जगण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजननिर्मिती साठीची खंत वाटत होती त्यासाठी सह्याद्री देवराई संस्था स्थापली.

आजवर कुठल्यातरी नटाने, खेळाडूने सावलीसाठी, ऑक्सिजनसाठी प्रयत्न केला आहे का? त्यांनी केवळ जनसामान्याच्या भावनांशी खेळून पैसा कमावला आहे पण आपण आपल्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी शुद्ध हवेचे स्रोत तयार करूया.

काही वर्षे जगणाऱ्या माणसाच्या मृत्यू नंतर त्याची शोकसभा होते पण जे वर्षानुवर्षे झाडे होती ती पडल्यावर त्याची शोकसभा केली का? आपण जेवढं वर्षे जगलो तेवढी तरी किमान झाडं लावली पाहिजेत. पोटासाठी पैसा नाही तर अन्न गरजेचं आहे त्यासाठी वृक्ष महत्वाची आहेत त्यासाठी झाडे लावा.

जुन्या लोकांकडे शिक्षण नव्हते पण अक्कल होती ते जे जीवन जगत होते तेच खरं सोनं होतं. वृक्ष जितकं महत्वाचं आहे त्यापाठोपाठ त्याचं संगोपन करणारा ही महत्वाचा आहे. आपण कोणाचं आयुष्य वाचवू शकत नाही पण त्यांच्या आठवणींनी लावलेले वृक्ष जपले तर त्यांची आठवण चिरंतन राहील असे आवाहन त्यांनी केले.

शिंदे म्हणाले, या पुरस्काराने हे नक्की समजलं की मी ज्या दिशेने जातोय ती योग्य दिशा आहे यामुळे मला पुढे काम करण्याची अजून प्रेरणा मिळेल.

प्रमुख पाहुणे डॉ.राजन गवस म्हणाले, आजच्या पिढीला वृक्षांचे महत्व समजले नाही ही पिढी कसले शिक्षण घेत आहे? या सगळ्यात सयाजी शिंदे हे वादळात दिवा लावत आहेत अशा माणसाला हा पुरस्कार प्रेरणा देईल. तुम्ही चाळण केलेल्या जमिनीला केवळ देशी वृक्षच वाचवू शकतात.

पुरस्काराविषयी भूमिका व्यक्त करताना आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, चळवळीतून जे समाज घडवतात त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. आजवर कोणाही राजकारण्यांना किंवा सामाजिक भूमिका सोडून हा पुरस्कार दिला गेला नाही. 
क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड हे कसे जगले, त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान, त्यांनी केलेला त्याग नवीन पिढीला माहिती व्हावा म्हणून समाजात असे अलौकिक काम करणाऱ्या व्यक्तींना क्रांतिअग्रणी पुरस्कार प्रदान करणेत येतो.

प्रारंभी क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड, क्रांतिवीरांगणा विजयाकाकू लाड यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करणेत आले.

स्वागत व प्रास्ताविक अशोक पवार यांनी केले, मानपत्र वाचन डॉ.पी.बी. लाड यांनी केले, आभार अर्जुन कुंभार यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, उद्योजक उदय लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, व्ही.वाय. पाटील, बाळासाहेब होनमोरे, दादासाहेब ढेरे, पृथ्वीराज कदम, न्यायमूर्ती अरुण लाड, यांचेसह क्रांती कारखाण्याचे संचालक, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, सर्व संस्थांचे पदाधिकारी, परिसरातून बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


औदुंबर येथील दत्त मंदिरात भक्तांना प्रसादाच्या रुपात देशी वृक्ष देण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी इच्छा सयाजी शिंदे यांनी आमदार अरुण लाड यांच्यापुढे व्यक्त केली.



देशी वृक्ष असलेले वड आणि पिंपळ हा कोणत्याही विकासासाठी तोडता कामा नये यासाठी शासकीय स्थरावर प्रयन होणे गरजेचे असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले.



क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या 101 व्या जयंती निमित्त दिला जाणारा क्रांतिअग्रणी पूरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना प्रदान करताना प्रा.डॉ. राजन गवस. बाजूस आमदार अरुणअण्णा लाड, प्रा.डॉ.राजन गवस.
हे पण पहा ----




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆